"अविनाश जोगदंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:

अर्धवट शिक्षण झालेल्या अविनाशने पुण्याला एका कंत्राटदाराकडे सुपरवायझरचे काम स्वीकारले. इमारत बांधणीचे काम करणारे हे मजूर वेळ वाया घालवतात, हे लक्षात आल्यावर अविनाशने त्यांच्या कामाच्या वेळेआधीच साहित्य उपलब्ध करून देत त्यांचे दुपारच्या जेवणाचे डबे एकत्र करायला सुरुवात केली. यामुळे काम वेगात होऊ लागले. हे बघून कंत्राटदारही खूश झाला. अविनाश दीड वर्षे त्यांच्याकडे राबला. पण एक पैशाचाही मोबदला त्याला मिळाला नाही व त्यानेही मागितला नाही.

==उच्च शिक्षण==
पुण्यात कंत्राटदाराकडे काम करता करता अविनाशने अधिकचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे बी.ई.एम.एस., डी.ई.ई. या पदव्या/पदविका आहेत. पुण्याच्या एम.आय.टी.मधून त्यांनी
एम.पी.जी. हा, आणि मास्टर प्रोग्राम इन गव्हर्नन्स ऑफ गव्हर्मेंट हाही अभ्यासक्रम पुरा केला.

==दीडशे रुपयांची उसनवारी==
==दीडशे रुपयांची उसनवारी==
ओळ ३१: ओळ ३५:
==अधिक प्रगती==
==अधिक प्रगती==
अविनाशच्या ‘रामेलेक्स’ने मग मागे वळून बघितलेच नाही. आज उच्चदाब वीजवाहिनी यंत्रणा उभारणाऱ्या देशातील काही मोजक्या कंपन्यांच्या यादीत ‘रामेलेक्स’चा समावेश होतो. कोट्यवधींची वार्षिक उलाढाल असलेल्या या कंपनीचे मुख्यालय पुण्याच्या एनडीए रस्त्यावरील दांगट औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. देशातील अनेक राज्यांत या कंपनीची कामे सध्या सुरू आहेत. आज अडीचशे कामगार या कंपनीत काम करतात.

==अविनाश जोगदंड यांची औद्योगिक कारकीर्द==
* मुख्य कार्यकारी अधिकारी, गीताई ह्युुमनकाइंंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे
* कार्यकारी संचालक, रामेलेक्स ग्रुप, पुणे
* चेअरमन, आय.टी.आय.ए. (आय.एम.सी.), लोणार
* उपाध्यक्ष, शिवने इंडस्ट्रीज असोसिएशन, पुणे
* असोसिएट मेम्बर, एफ.आय.सी.सी.आय. (फिकी) दिल्ली
* संचालक, वेदान्त पब्लिक स्कूल, कारंजा /पोहो /आमखेडा /पुणे
* संस्थापक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी तंत्र निकेतन, आमखेडा
* संचालक, वित्त व नियोजन कृषी पर्यटन विकास संस्था, पुणे. :
ह्या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या च्या आतील शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र उभारण्याकरिता संपूर्ण मदत केली जाते. २०१६ सालापर्यंत २५० शेतकर्‍यांना अशी मदत मिळाली आहे.

==कामगार वसाहत==
==कामगार वसाहत==

०६:२१, २८ मे २०१६ ची आवृत्ती

अविनाश जोगदंड (जन्म : ३० नोव्हेंबर, इ.स. १९७३) हे एक मराठी उद्योजक आहेत.

वाशीम जिल्ह्यच्या मालेगाव तालुक्यात आमखेडा नावाचे गाव आहे. वर्षांनुवर्षांची नापिकी हेच ज्या गावाचे नशीब त्या गावात अविनाशचा जन्म झाला.

अविनाशचे वडील बाबाराव व्यवसायाने डॉक्टर. घरी ७० एकर शेती व सख्खे, चुलत मिळून २५ जणांचा गोतावळा होता. वडिलांनी अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देतसत. अविनाशनेदेखील डॉक्टर व्हावे अशी बाबारावांची इच्छा होती. संस्कारित माणूस व्हावे म्हणून ते अविनाशला प्रत्येक सुटीत बुलढाणा जिल्ह्यतील हिवऱ्याच्या विवेकानंद आश्रमात व गुरुकुंज मोझरीच्या तुकडोजी आश्रमात सेवा करायला पाठवत.

अविनाशचे आठवीपर्यंतचे शिक्षण - आमखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे दहावी झाल्यावर वडिलांच्या इच्छेखातर त्याने अकोल्याला इलेक्ट्रोपॅथीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. इच्छेविरुद्ध शिक्षण घेत असलेल्या अविनाशने घरची मदत घेण्याचे नाकारले व एका मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी धरली. वर्षभर नोकरी व शिक्षण अशी धावपळ केली. पण शिक्षणात मन रमेना. अखेर एक दिवस कुणालाही न सांगता अविनाश शिक्षण सोडून थेट पुण्याला पोहोचला.

अर्धवट शिक्षण झालेल्या अविनाशने पुण्याला एका कंत्राटदाराकडे सुपरवायझरचे काम स्वीकारले. इमारत बांधणीचे काम करणारे हे मजूर वेळ वाया घालवतात, हे लक्षात आल्यावर अविनाशने त्यांच्या कामाच्या वेळेआधीच साहित्य उपलब्ध करून देत त्यांचे दुपारच्या जेवणाचे डबे एकत्र करायला सुरुवात केली. यामुळे काम वेगात होऊ लागले. हे बघून कंत्राटदारही खूश झाला. अविनाश दीड वर्षे त्यांच्याकडे राबला. पण एक पैशाचाही मोबदला त्याला मिळाला नाही व त्यानेही मागितला नाही.

उच्च शिक्षण

पुण्यात कंत्राटदाराकडे काम करता करता अविनाशने अधिकचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे बी.ई.एम.एस., डी.ई.ई. या पदव्या/पदविका आहेत. पुण्याच्या एम.आय.टी.मधून त्यांनी एम.पी.जी. हा, आणि मास्टर प्रोग्राम इन गव्हर्नन्स ऑफ गव्हर्मेंट हाही अभ्यासक्रम पुरा केला.

दीडशे रुपयांची उसनवारी

एक दिवस गावी आजोबा आठवण काढताहेत असा निरोप अविनाशला मिळाला. हा निरोप मिळताच अविनाशने कंत्राटदाराकडे गावी जाण्यासाठी दीडशे रुपये मागितले. त्याने ते देण्यास नकार दिला. त्याने त्याक्षणीच ते काम सोडले. काकांकडून उसने पैसे घेतले व गावी परतला.

वायरिंगचे काम

गावात अनेकांनी त्याची टिंगल केली. घरी बोलणी खावी लागली. त्यामुळे व्यथित झालेल्या अविनाशने पुन्हा पुण्याचा रस्ता धरला. आता काकांची उसनवारी फेडण्यासाठी त्यांच्याच सोबत वायरिंगचे काम करायचे असे त्याने ठरवले. नवीन बांधकामे शोधायची, कंत्राटदाराला गाठायचे आणि इलेक्ट्रिक वायरिंगचे काम मिळेल का, ही चौकशी करायची- असा अविनाशचा दिनक्रम १९९२ पासून सुरू झाला.

मोठी कामे

अविनाश व त्याच्या काकांना एका बडय़ा बांधकाम व्यावसायिकाच्या इलेक्ट्रिक हाऊस वायरिंगचे काम मिळाले. काका, पुतण्या व त्यांच्या हाताखाली काम करणारे चार मजूर एवढय़ा मनुष्यबळावर त्यांनी विक्रमी कालावधीत हे काम पूर्ण केले. आणि मग अनेक मोठी कामे त्यांना मिळायला सुरुवात झाली.

वीजवहन क्षेत्रातील कामे

केवळ वायरिंगची कामे करून भागणार नाही, तर वीजवहनाच्या क्षेत्रातील इतर कामे केली तरच मोठे होता येईल, हे लक्षात आल्यावर अविनाशने वीज मंडळात कामे मिळावी म्हणून प्रयत्‍न सुरू केले.

खूप प्रयत्‍नांनंतर अविनाशला पुण्याजवळ भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम मिळाले. मग वीज मंडळाची उपकेंद्रे व केंद्रे उभारण्याची कामे त्यांना मिळू लागली.

कंपनीची स्थापना

१९९४ मध्ये अविनाश व त्याच्या काकाने रामेलेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली व तिच्या माध्यमातून वीजवहनाच्या क्षेत्रातील कामे मिळवायला सुरुवात केली.

कॉम्प्रेशन टाइप क्लॉप्स

वीज मंडळाची कामे करताना अविनाशच्या कंपनीने वीज वाहून नेताना होणारी हानी कशी टाळता येईल, यादृष्टीने संशोधन सुरू केले. यातून त्यांना ‘कॉम्प्रेशन टाइप क्लॉप्स अॅन्ड कंडक्टर’ ही पद्धत सुचली.

अधिक प्रगती

अविनाशच्या ‘रामेलेक्स’ने मग मागे वळून बघितलेच नाही. आज उच्चदाब वीजवाहिनी यंत्रणा उभारणाऱ्या देशातील काही मोजक्या कंपन्यांच्या यादीत ‘रामेलेक्स’चा समावेश होतो. कोट्यवधींची वार्षिक उलाढाल असलेल्या या कंपनीचे मुख्यालय पुण्याच्या एनडीए रस्त्यावरील दांगट औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. देशातील अनेक राज्यांत या कंपनीची कामे सध्या सुरू आहेत. आज अडीचशे कामगार या कंपनीत काम करतात.

अविनाश जोगदंड यांची औद्योगिक कारकीर्द

  • मुख्य कार्यकारी अधिकारी, गीताई ह्युुमनकाइंंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे
  • कार्यकारी संचालक, रामेलेक्स ग्रुप, पुणे
  • चेअरमन, आय.टी.आय.ए. (आय.एम.सी.), लोणार
  • उपाध्यक्ष, शिवने इंडस्ट्रीज असोसिएशन, पुणे
  • असोसिएट मेम्बर, एफ.आय.सी.सी.आय. (फिकी) दिल्ली
  • संचालक, वेदान्त पब्लिक स्कूल, कारंजा /पोहो /आमखेडा /पुणे
  • संस्थापक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी तंत्र निकेतन, आमखेडा
  • संचालक, वित्त व नियोजन कृषी पर्यटन विकास संस्था, पुणे. :

ह्या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या च्या आतील शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र उभारण्याकरिता संपूर्ण मदत केली जाते. २०१६ सालापर्यंत २५० शेतकर्‍यांना अशी मदत मिळाली आहे.

कामगार वसाहत

कामगारांकडून चांगले काम करून घेता यावे म्हणून अविनाशने पुण्याजवळ ४० हजार चौरस फुटांचा एक भूखंड विकत घेतला आणि त्यावर या कामगारांसाठी एक वसाहत उभारून दिली. यात फ्लॅट आहेत, सिंगल रूम्स् आहेत, शाळा आहे, मोठे सभागृह आहे आणि खेळाचे मैदानही आहे.

‘रामेलेक्स’ कंपनीचे काम सकाळी नऊ वाजता सुरू होते. सर्व कर्मचारी, अविनाश, त्याचे काका, कंपनीची वित्त संचालक असलेली त्याची पत्‍नी हे सारे जमले की राष्ट्रगीताने कामाला सुरुवात होते. सायंकाळी सहा वाजता काम संपले की अर्धा तास ध्यानधारणा होते. प्रत्येक सुटीच्या दिवशी पूर्ण जोगदंड कुटुंबीय या वसाहतीत असतात. कामगार व कर्मचाऱ्यांसोबत वेळ घालवतात. प्रत्येक महिन्यात वसाहतीत एका नामवंताचे व्याख्यान होते.

‘रामेलेक्स’ ही कंपनी खासगी असली तरी प्रत्येक कर्मचाऱ्याला ती आपलीच वाटते. लहान असताना वडिलांनी स्वामी विवेकानंद व तुकडोजींच्या आश्रमात पाठवले. तेथे मनात रुजलेले सेवेचे संस्कार आता असे कामी आले.