"अविनाश जोगदंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अविनाश जोगदंड (जन्म : ३० नोव्हेंबर, इ.स. १९७३) हे एक मराठी उद्योजक आह... |
(काही फरक नाही)
|
०५:४८, २८ मे २०१६ ची आवृत्ती
अविनाश जोगदंड (जन्म : ३० नोव्हेंबर, इ.स. १९७३) हे एक मराठी उद्योजक आहेत.
वाशीम जिल्ह्यच्या मालेगाव तालुक्यात आमखेडा नावाचे गाव आहे. वर्षांनुवर्षांची नापिकी हेच ज्या गावाचे नशीब त्या गावात अविनाशचा जन्म झाला.
अविनाशचे वडील बाबाराव व्यवसायाने डॉक्टर. घरी ७० एकर शेती व सख्खे, चुलत मिळून २५ जणांचा गोतावळा होता. वडिलांनी अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देतसत. अविनाशनेदेखील डॉक्टर व्हावे अशी बाबारावांची इच्छा होती. संस्कारित माणूस व्हावे म्हणून ते अविनाशला प्रत्येक सुटीत बुलढाणा जिल्ह्यतील हिवऱ्याच्या विवेकानंद आश्रमात व गुरुकुंज मोझरीच्या तुकडोजी आश्रमात सेवा करायला पाठवत.
अविनाशचे आठवीपर्यंतचे शिक्षण - आमखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे दहावी झाल्यावर वडिलांच्या इच्छेखातर त्याने अकोल्याला इलेक्ट्रोपॅथीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. इच्छेविरुद्ध शिक्षण घेत असलेल्या अविनाशने घरची मदत घेण्याचे नाकारले व एका मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी धरली. वर्षभर नोकरी व शिक्षण अशी धावपळ केली. पण शिक्षणात मन रमेना. अखेर एक दिवस कुणालाही न सांगता अविनाश शिक्षण सोडून थेट पुण्याला पोहोचला.