"संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ८: | ओळ ८: | ||
आणि संतकृपेनेच ही भूलोकीच्या वैकुंठाची वाट गवसते. |
आणि संतकृपेनेच ही भूलोकीच्या वैकुंठाची वाट गवसते. |
||
==ख्रिश्चन धर्मातील संतपदे== |
|||
महाराष्ट्रात संतपरंपरेमध्ये चमत्काराला नकार देणारी आणि मानवतेच्या सेवेला खरे संतत्व मानणारी 'जे का रंजले गांजले' म्हणणारे संत तुकाराम, तसेच तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशी मोठी परंपरा आहे. युरोपात पाहिले तरी चमत्काराला आव्हान देणारी प्रबोधनाची प्रचंड मोठीच परंपरा तेथे आहे. गॅलिलिओला दिलेल्या शिक्षेबद्दल तीनशे वर्षांनी का होईना माफी मागून सत्यशोधनाविषयी आस्था दाखवण्याचे धारिष्ट्य तेथे दाखवण्यात आले. |
|||
असे असले तरी ख्रिश्चन धर्मात संतपद देण्यासाठी चमत्काराची अट ठेवली आहे. |
|||
===मदर तेरेसा आणि संतपद=== |
|||
मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, संतपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता. 'मोनिका बसेरा', नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचे ठरवले तर एखादी व्यक्ती मृत्यूनंतर देखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. थोडे पुढे जाऊन ह्या दाव्यातील वास्तव आपण समजून घेतले, तर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशीमध्ये पुढे हे देखील समोर आले होते की प्रत्यक्षात मोनिका बसेरा ह्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता आणि त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारांनी ती गाठ बरी झाली होती. त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या नेतृत्वाखाली 'महा. अंनिस'ने ह्या चमत्काराच्या दाव्याला विरोध केला होता आणि वास्तव समाजापुढे ठेवले होते. आत्ता देखील त्याच पद्धतीने, २००८ मध्ये केवळ मदर तेरेसा ह्यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्यामुळे ब्राझीलमधील एका व्यक्तीच्या मेंदूतील गाठी बऱ्या झाल्याचा चमत्कार घडल्याचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याला नक्की कोणता आजार होता, प्रार्थनेमुळेच हा आजार बरा झाला, हे कशावरून सिद्ध होते, यांपैकी कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता केवळ चमत्कार झाला, असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही. |
|||
==चमत्काराने आजार बरे होण्यातला धोका== |
|||
कर्करोगासारखे आजार हे चमत्काराने बरे होतात, असा समज लोकांमध्ये पसरणे हे अतिशय गंभीर आहे. असे समज जेव्हा समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या नावाने पसरवले जातात, तेव्हा ते समज ह्या व्यक्तींना शास्त्रीय उपचारांच्या पासून दूर नेणारे आणि त्यामुळेच हानिकारक देखील ठरू शकतात. म्हणून एखाद्या व्यक्तीला 'संत' जाहीर करण्यासाठी चमत्कारांची अट ही केवळ विज्ञान विरोधीच नाही, तर लोकांच्या शोषणाला देखील कारणीभूत ठरू शकणारी आहे. |
|||
==संत विषयावरची पुस्तके== |
==संत विषयावरची पुस्तके== |
०५:४७, २६ मे २०१६ ची आवृत्ती
संतत्व
संत या शब्दाचा धात्वर्थ सद्वस्तू असा आहे. तीनही काळी जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच संत असे म्हणतात. देहाहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनला आहे, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे संतत्व होय. साधू, संत, सज्जन आणि भगवद्भक्त हे साधारणपणे एकच असतात. भगवद्गीतेमधील दुसर्या अध्यायातील स्थितप्रज्ञ, सहाव्या अध्यायातील योगी, बाराव्या अध्यायातील ज्ञानोत्तर भक्त, चौदाव्या अध्यायातील गुणातीत आणि अठराव्या अध्यायातील कर्मसंन्यासी, हे सर्व एकच. ब्रह्मनिष्ठ किंवा ईश्वरभावाला प्राप्त झालेल्या विभूतींची नावे जरी भिन्न असली तरी वृत्ती सारखीच असते. भागवतात अशा महात्म्यांना "भागवत' किंवा भागवतोत्तम संत असे म्हणतात. हे भागवतोत्तम सत्पुरुष समदर्शी असतात. सम याचा एक अर्थ व्यावहारिकाच्या म्हणजे उपाधीच्या पलीकडचा, तर सम शब्दाचा दुसरा अर्थ ब्रह्म म्हणजेच सर्वच ब्रह्म किंवा ईश्वर पाहणारा, असा आहे. मुंडकोपनिषदात "श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं' अशी संतांची लक्षणे सांगितली आहेत. श्रुतिसंपन्नता आणि ब्रह्मनिष्ठता याबरोबरच कृपाळूपणा हा संतांचा महत्त्वाचा गुण. श्रुतिसंपन्नतेने ब्रह्मनिष्ठ झालेले संत कृपेचा वर्षाव करतात.
साधुसंत मायबाप
तिंही केले कृपादान ।
पंढरिये यात्रे नेले
घडले चंद्रभागे स्नान ।।
आणि संतकृपेनेच ही भूलोकीच्या वैकुंठाची वाट गवसते.
ख्रिश्चन धर्मातील संतपदे
महाराष्ट्रात संतपरंपरेमध्ये चमत्काराला नकार देणारी आणि मानवतेच्या सेवेला खरे संतत्व मानणारी 'जे का रंजले गांजले' म्हणणारे संत तुकाराम, तसेच तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशी मोठी परंपरा आहे. युरोपात पाहिले तरी चमत्काराला आव्हान देणारी प्रबोधनाची प्रचंड मोठीच परंपरा तेथे आहे. गॅलिलिओला दिलेल्या शिक्षेबद्दल तीनशे वर्षांनी का होईना माफी मागून सत्यशोधनाविषयी आस्था दाखवण्याचे धारिष्ट्य तेथे दाखवण्यात आले.
असे असले तरी ख्रिश्चन धर्मात संतपद देण्यासाठी चमत्काराची अट ठेवली आहे.
मदर तेरेसा आणि संतपद
मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, संतपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता. 'मोनिका बसेरा', नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचे ठरवले तर एखादी व्यक्ती मृत्यूनंतर देखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. थोडे पुढे जाऊन ह्या दाव्यातील वास्तव आपण समजून घेतले, तर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशीमध्ये पुढे हे देखील समोर आले होते की प्रत्यक्षात मोनिका बसेरा ह्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता आणि त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारांनी ती गाठ बरी झाली होती. त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या नेतृत्वाखाली 'महा. अंनिस'ने ह्या चमत्काराच्या दाव्याला विरोध केला होता आणि वास्तव समाजापुढे ठेवले होते. आत्ता देखील त्याच पद्धतीने, २००८ मध्ये केवळ मदर तेरेसा ह्यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्यामुळे ब्राझीलमधील एका व्यक्तीच्या मेंदूतील गाठी बऱ्या झाल्याचा चमत्कार घडल्याचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याला नक्की कोणता आजार होता, प्रार्थनेमुळेच हा आजार बरा झाला, हे कशावरून सिद्ध होते, यांपैकी कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता केवळ चमत्कार झाला, असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही.
चमत्काराने आजार बरे होण्यातला धोका
कर्करोगासारखे आजार हे चमत्काराने बरे होतात, असा समज लोकांमध्ये पसरणे हे अतिशय गंभीर आहे. असे समज जेव्हा समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या नावाने पसरवले जातात, तेव्हा ते समज ह्या व्यक्तींना शास्त्रीय उपचारांच्या पासून दूर नेणारे आणि त्यामुळेच हानिकारक देखील ठरू शकतात. म्हणून एखाद्या व्यक्तीला 'संत' जाहीर करण्यासाठी चमत्कारांची अट ही केवळ विज्ञान विरोधीच नाही, तर लोकांच्या शोषणाला देखील कारणीभूत ठरू शकणारी आहे.
संत विषयावरची पुस्तके
- संतांची मांदियाळी (संकलक - मुक्ता केणेकए. ‘संतांची मांदियाळी’ या उपक्रमाच्या व्याख्यानमालेतील निवडक व्याख्यानांचे संकलन)
तुकाराम दर्शन ; लेखक सदानंद मोरे