"लंडनच्या आजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लंडनच्या आजीबाई म्हणजे १९५०-६०-७० च्या दशकांत इंग्लंडमध्ये शिक्...
(काही फरक नाही)

२२:११, २५ मे २०१६ ची आवृत्ती

लंडनच्या आजीबाई म्हणजे १९५०-६०-७० च्या दशकांत इंग्लंडमध्ये शिक्षण तसेच नोकरीधंद्यासाठी गेलेल्या अनेक भारतीयांवर मायेची पाखर धरणार्‍या बनारसे आजी.

राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, यवतमाळ जिल्ह्यातील एका आडबाजूच्या खेडेगावात जन्माला आली. ही एक अशिक्षित, अडाणी स्त्री. लग्नानंतर पाच मुली झाल्यावर या बाईचा नवरा अकाली गेला आणि ऐन पस्तिशीत ती विधवा झाली. पण तोवर तिच्या तीन मुलींची लग्ने झाली होती. उरलेल्या दोन मुली पदरात होत्या. नवर्‍यापश्चात सासरची मंडळी आणि परिस्थितीने असहकार पुकारलेला असताना लंडनचे आबाजी बनारसे हे विधुर गृहस्थ आपल्या गावी आले, त्यांनी या विधवेशी लग्न केले आणि साधी गावची सीमाही न ओलांडलेली ही स्त्री चक्क लंडनला जाण्यासाठी आगबोटीवर चढली.

लंडनमध्ये गेल्यावर

लंडनमध्ये आबाजींच्या विठ्ठल आणि पांडुरंग या विवाहित मुलांना वडलांचे हे दुसरे लग्न पसंत नसल्यानं राधाबाईंचे ल्ळ्डनमध्ये थंडे स्वागत झाले. घरात राबायला एक गुलाम मिळाला, यापलीकडे त्यांना कुणी गृहीत धरले नव्हते. आबाजींची मुले तिथं लॉजिंग-बोर्डिग चालवत होती. भारतातून शिक्षण व नोकरीसाठी लंडनला आलेल्या भारतीयांना निवारा आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था ते करीत असत. सावत्र नातवंडे त्यांना ‘आजी’ म्हणून हाक मारीत. साहजिकच इतरही लोक राधाबाईंना ‘आजी’ म्हणू लागले. एकीकडे घरात गुलामासारखं राब राब राबत असताना आजीबाई हळूहळू तिथली भाषा, संस्कृती, माणसे यांच्याशी परिचित होत गेल्या. त्यांच्या हाताला चव होती. त्यामुळे त्यांच्या खाणावळीला बरकत येत गेली. परंतु अचानक आबाजी गेले आणि बनारसे आजी पुन्हा रस्त्यावर आल्या. सावत्र मुलांनी त्यांना घराबाहेर काढले.

शून्यातून सुरुवात