Jump to content

"शीतल तळपदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शीतल तळपदे हे नाट्यप्रयोगांची प्रकाशयोजना करणारे नाट्यकर्मी आ...
(काही फरक नाही)

२२:१५, २४ मे २०१६ ची आवृत्ती

शीतल तळपदे हे नाट्यप्रयोगांची प्रकाशयोजना करणारे नाट्यकर्मी आहेत.

तळपदे यांचे बालपण सोलापूरमध्ये आणि अलिबाग तेथे गेले. त्या गावांत सणासुदीला जावे तसे लोक नाटकाला जात. थिएटरमधले वातावरण, धुंद वास, बंद पडद्याआड काय दडले आहे याची लोकांत चाललेली चर्चा, तीन घंटा, तिसऱ्या घंटेबरोबर मंद होणारा प्रकाश आणि नंतर उजळत जाणाऱ्या रंगमंचावर पात्रांच्या अभिनयाचा आविष्कार हे पाहून तळपदे भारून जात. मात्र त्यांना नाटकातील प्रत्यक्ष सहभागाची संधी विलेपार्ले-मुंबईतील नरसी मोनजी महाविद्यालयात आणि नंतर ‘माध्यम’ या हौशी नाट्यसंस्थेत मिळाली. तिथे अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, बॅकस्टेज, मिळेल ते करावे लागे. या ‘माध्यम’ संस्थेत जबरदस्त ताकदीचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार, नेपथ्यकार होते. मात्र प्रकाशयोजनेच्या बाबतीत ही नाट्यसंस्था पूर्णपणे बाहेरच्या व्यक्तींवर अवलंबून होती.

संस्थेचा स्वतःचा प्रकाशयोजनाकार

‘माध्यम’संस्थेच्या एका नाटकाचा स्पर्धेसाठीचा प्रयोग होता, त्यात शीतल तळपदे छोटीशी भूमिका करीत होते. नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी ठरविलेला प्रकाशयोजनाकार न आल्याने तळपदे यांनी त्या नाटकाची प्रकाशयोजना केली, त्यांना बक्षीस मिळाले आणि संस्थेला त्यांचा हक्काचा प्रकाशयोजनाकार मिळाला.