Jump to content

"अजय खानविलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अजय खानविलकर (जन्म : पुणे, ३० जुलै, इ.स. १९५७) हे एक मराठी न्यायाधीश आ...
(काही फरक नाही)

१५:५२, २४ मे २०१६ ची आवृत्ती

अजय खानविलकर (जन्म : पुणे, ३० जुलै, इ.स. १९५७) हे एक मराठी न्यायाधीश आहेत. २०१६ साली ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयांत मुख्य न्यायाधीश झाले.

खानविलकर यांनी मुंबईतील मुलुंडच्या वाणिज्य महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्यानंतर तेथेच के.सी. विधिमहाविद्यालयातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.

अजय खानविलकरांनी १० फेब्रुवारी १९८२ रोजी वकिलीला सुरुवात केली. दिवाणी दावे आणि फौजदारी खटल्यांसोबतच त्यांचा घटनात्मक पेच असलेली प्रकरणेही चालवून, दोनच वर्षांत (१९८४ पासून) सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करू लागले. १९८५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. डिसेंबर १९८९ पर्यंत त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. जानेवारी १९९० मध्ये केंद्र सरकारच्या वकील पॅनलवर त्यांची नियुक्ती झाली होती. पुढे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्यावर ते हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश झाले आणि मग मध्य प्रदेशात गेले. .