"कन्फ्युशियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: कन्फ्युशियस हा थोर विचारवंत चीनमध्ये इ. स. पूर्व पाचव्या शतकात हो... |
(काही फरक नाही)
|
०६:३३, २४ मे २०१६ ची आवृत्ती
कन्फ्युशियस हा थोर विचारवंत चीनमध्ये इ. स. पूर्व पाचव्या शतकात होऊन गेला. पित्याचं बारावे अपत्य असलेल्या कन्फ्युशियसला आयुष्यभर खस्ता खाव्या लागल्या. वयाच्या तिसऱ्या वर्षी पितृछत्र हरपले. अभावांमध्ये जगत असूनही या मुलाच्या बुद्धीची झेप विलक्षण होती. तो व्यायामाचा जेवढा भोक्ता होता, तेवढाच काव्य अन् संगीताचाही. त्याने वेगाने पुष्कळ ज्ञान मिळवले. तो पंधरा वर्षांचा असतानाच त्याचे गुरुजन सांगू लागले, की आता याला देण्यासारखे आमच्याकडं काही उरलेले नाही.
पुढं दोन वर्षांनी त्याला तो करत असलेलं ज्ञानार्जन थांबवावे लागले. गरीब आईला त्याची मदत हवी होती. त्यालाही ते कर्तव्य पूर्ण करण्याची ओढ होती. तो आपल्या राज्यातील शेती खात्यात कारकून झाला. सतरा वर्षांच्या मुलाला ती जबाबदारी पेलणे कठीण असली, तरी त्याने कसलीच कुरकुर केली नाही. जास्तीत जास्त बोजा उचलण्याची जणू त्याला सवयच होती. एकोणीस वर्षांचा असतानाच लग्न झाले. एक वर्षानंतर मुलगा झाला. चोविसाव्या वर्षी आई सोडून गेली. चीनमधल्या जुन्या प्रथेप्रमाणे त्यानं मातृशोक म्हणून नोकरी सोडली. अडीच वर्षांची ही मुदत त्याने अक्षरश: पाळली.
या वेळपावेतो त्याची कीर्ती अतिबुद्धिमान म्हणून सर्वत्र झाली होती. प्रगल्भ मनाचा कन्फ्युशियस मित्रांमध्ये लोकप्रिय होता. त्यांनी आग्रह केल्यामुळे तो फिरता आचार्य झाला. जाई तिथे त्याचे विचार ऐकायला लोक जमत. प्रश्नोत्तरे चालत. तो खूप फिरला. त्याचे विचार दूरवर पसरले. या ज्ञानसत्राबद्दल तो श्रीमंतांकडून थोडी गुरुदक्षिणा घेई. गरिबांनी दिलेले मूठभर तांदूळही समाधानाने स्वीकारी. उदात्त व उदार जीवनाची शिकवण त्यानं सर्वांना दिली. तोच उद्योग अथकपणे केला. श्रेष्ठ माणसांचा जणू नवाच वंश त्यानं चीनमध्ये निर्माण करण्याचा ध्यास घेतला होता.