"रफीक शेख (गिर्यारोहक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: गिर्यारोहक रफीक शेख हे एक मराठी गिर्यारोहक आहेत. जगातले सर्वोच्... |
(काही फरक नाही)
|
१३:३१, २२ मे २०१६ ची आवृत्ती
गिर्यारोहक रफीक शेख हे एक मराठी गिर्यारोहक आहेत. जगातले सर्वोच्च पर्वतशिखर एव्हरेस्ट सर करण्यात त्यांना तिसर्या प्रयत्नात यश आले. (१९ मे २०१६). या आधी त्यानी दोनदा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु २०१४ सालच्या मोसमात हिमस्खलन झाले आणि त्यात १६ शेरपा मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे शेख यांनाही मोहीम अर्धवट टाकून माघारी यावे लागले. त्यानंतर, २०१५ मध्ये पुन्हा तयारी केली. ते नेपाळपर्यंत गेले. पण त्याचवेळी भूकंपाने हिमालय हादरला आणि बेस कँपवर हिमकडा कोसळल्याने त्यांची ही मोहीमही अर्धवट राहिली.
रफीक शेख हे महाराष्ट्र ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल आहेत. त्यांची नेमणूक औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद या शहरात आहे. हा परिसर डोंगर-दर्यांनी नटलेला आहे. आपली पोलीस खात्यातली ड्युटी करून त्या परिसरातील डोंगर चढायचा सराव करीत असत.. पाठीवर २० किलो वजन घेऊन दौलताबादचा किल्ला ते चढत आणि उतरत. एका दिवसांचा सुद्धा खंड पडू न देता सतत चार वर्षे त्यांनी हा सराव केला.
दहा वर्षे तयारी
एव्हरेस्ट सर्करण्याच्या दृष्टीने शेख यांनी दहा वर्षांपूर्वी मराठ्वाडा परिसरात तयारी सुरू केली होती. हिमालयातील आठ शिखरे त्यांनी आधीच सर केली होती, पण समुद्रसपाटीपासून ८ हजार ८४८ मीटर उंचीवर असलेले एव्हरेस्ट सर करणे, हेच त्यांचे अंतिम ध्येय होते. आधीची दहा वर्षे दररोज सायकलिंग, पाठीवर सॅक घेऊन स्थानिक डोंगरांवर चढाई, तज्ज्ञ गिर्यारोहकांचे मार्गदर्शन असा त्यांचा भरगच्च दिनक्रम होता. यातून, ताकद आणि आत्मविश्वासही आला.
एव्हरेस्ट मोहिमेवर प्रत्येकी किमान २५ लाख रुपये खर्च येतो. त्यासाठी मग शेख यांनी पोलिस कर्मचारी सोसायटीतून आणि बँकेतून कर्ज घेतले. औरंगाबादचे उद्योजक, प्राध्यापक आणि सहकार्यांकडूनही मदत घेतली. दोनवेळा मोहीम अयशस्वी झाल्यामुळे ते कष्टी झाले होते, पण खचले नव्हते. यंदा २०१६ साली पुन्हा नव्या उमेदीने ४ एप्रिलला त्यांनी मोहीम सुरू करून एव्हरेस्ट सर करूनच दाखविले.