Jump to content

"दत्ता देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दत्ता देसाई (जन्म : १४ एप्रिल, इ.स. १९५६) हे पाणी, शिक्षण, जनविज्ञान, आ...
(काही फरक नाही)

०६:४४, २१ मे २०१६ ची आवृत्ती

दत्ता देसाई (जन्म : १४ एप्रिल, इ.स. १९५६) हे पाणी, शिक्षण, जनविज्ञान, आदिवासी, स्त्री सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत काम करणारे करणारे एक मराठी सामाजिक कार्यकर्ते आहेत.

देसाई यांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला काही काळ टेलिफोन खात्यात नोकरी केली. नंतर महाराष्ट्र व आंध्र बॅँकेत त्यांची निवड झाली. तेथे उपशाखाव्यवस्थापक पदापर्यंत ते पोहोचले. पण समाजकार्याची आवड असल्याने १९८३ मध्ये बॅँकेची नोकरी सोडून देऊन त्यांनी पुणे येथील समाज विज्ञान अकादमीत दीर्घकाळ पूर्ण वेळ सचिव म्हणून काम केले. या संस्थेच्या माध्यमातून दत्ता देसाई यांनी महाराष्ट्र राज्यातील २५ जिल्ह्यांंमध्ये विद्यार्थी-युवक, कामगार-कर्मचारी, शेतकरी, महिला तसेच सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यास व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली.