"महेश काणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: चिपळूणला राहणारे महेश काणे हे एक मराठी कीर्तनकार आहेत. कै. नरेंद्... |
(काही फरक नाही)
|
१२:१९, १९ मे २०१६ ची आवृत्ती
चिपळूणला राहणारे महेश काणे हे एक मराठी कीर्तनकार आहेत. कै. नरेंद्रबुवा हाटे हे त्यांचे कीर्तनातले गुरू.
महेश काणे हे संगीत विशारद असून कीर्तन प्रशिक्षकही आहेत. इ.स. १९९७ पासून ते कीर्तनक्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या पाच राज्यांत त्यांची कीर्तनसेवा होत असते. ग्रंथांचा खोलवर अभ्यास असल्याने त्यांची कीर्तने बहारदार होतात. काणेबुवा लेखनही करतात.
पुरस्कार
- इंदूरला मिळालेला कीर्तन केसरी
- उज्जैनला मिळालेला कीर्तन विशारद
- पुणे येथील श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा नारद मंदिर या संस्थेतर्फे कीर्तनभास्कर : दत्तात्रेय राईलकर, रामचंद्रबुवा भिडे व मेहेंदळेबुवा या ज्येष्ठ कीर्तनकारांच्या मंडळाने काणे यांची या पुरस्कारासाठी निवड केली. (जानेवारी २०१४)