Jump to content

"बाबा हरदेव सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाबा हरदेव सिंग (जन्म : दिल्ली, २३ फेब्रुवारी, इ.स. १९५४; मृत्यू : मॉन...
(काही फरक नाही)

०५:४०, १८ मे २०१६ ची आवृत्ती

बाबा हरदेव सिंग (जन्म : दिल्ली, २३ फेब्रुवारी, इ.स. १९५४; मृत्यू : मॉन्टियल-कॅनडा, १३ मे, इ.स. २०१६) हे शीखांचे आध्यात्मिक गुरू होते. १९७१ मध्ये त्यांनी निरंकारी सेवादलामध्ये प्राथमिक सदस्य म्हणून प्रवेश केला आणि १९७५ मध्ये त्यांनी ‘निरंकारी युथ फोरम’ची स्थापना केली.

२४ एप्रिल १९८० रोजी कट्टरपंथी धर्माधांनी निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख, सद्गुरू बाबा गुरुबचन सिंहजी यांची हत्या केली. त्याच वेळी हरदेव सिंगांनी आपले वडीलही गमावले. तीन दिवसांनी, २७ एप्रिल १९८० रोजी बाबा हरदेव सिंहजी यांना मिशनचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. शांती, प्रेम आणि विश्वबंधुत्व स्थापन करण्याचे आश्वासन कृतीत उतरविण्यासाठी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी देश-विदेशांमध्ये विस्तृत प्रचार यात्रा आयोजित केल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशन मानवता, विश्वबंधुत्व, प्रेम, शांती, समता, अिहसा अशी महान ध्येये गाठणारी आध्यात्मिक चळवळ बनली.

शांती, संयम आणि औदार्य अशा त्रिगुणांच्या अनोख्या संगमामुळे बाबा हरदेव सिंह यांनी लाखो अनुयायी जोडले आणि मानवतेची पूजा करणारा निरंकारी पंथ जगभर फोफावला. संत निरंकारी मिशनमध्ये जगातील सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोिवदाने नांदतात, कारण कोणाच्याही व्यक्तिगत जीवनशैली किंवा श्रद्धा भावनांना धक्का न लावता केवळ मानवतेच्या आधारावर आपुलकी, प्रेम, सद्भावाने, सामंजस्याने व एकोप्याने आनंदाने जीवन जगायला शिकवणारी विचारधारा बाबा हरदेव सिंहजींनी जोपासली. बाबाजी यथार्थ व यशस्वी मानवी जीवन जगण्याची कला शिकवत असत. त्यांनी आध्यात्मिक व भौतिक जीवनाशी अशी सुंदर सांगड घातली, त्यामुळेच ही विचारधारा लोकप्रिय बनली.

कॅनडाच्या कल्याण यात्रेवर असताना त्यांचा १३-५-२०१६ रोजी गाडी अपघातामध्ये मृत्यू झाला.