"निदा फाजली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मुक्तबा हसन ऊर्फ निदा फाजली (जन्म : दिल्ली, १२ऑक्टोबर, इ.स.१९३८; मृत... |
(काही फरक नाही)
|
०७:०८, १५ मे २०१६ ची आवृत्ती
मुक्तबा हसन ऊर्फ निदा फाजली (जन्म : दिल्ली, १२ऑक्टोबर, इ.स.१९३८; मृत्यू : मुंबई, ८ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे एक उर्दू शायर होते.
दिल्लीत त्यांचा जन्म झाला आणि ग्वालियर येथे प्रारंभिक जीवन घडले. साठोत्तरी उर्दू शायरीचे ते एक महत्त्वपूर्ण शायर म्हणून भारत व पाकिस्तानात ओळखले जात. पहिला काव्यसंग्रह ‘लफ्जों का पूल’ने त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. आपल्या कवितेत, गीत आणि गझलांत त्यांनी नातेसंदर्भ, सत्य आणि असत्य इत्यादींचा मानवी मनाचे विश्लेषण करीत शोध घेतला आहे. देशविभाजनामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष, व्यक्तिगत दु:खे व तद्नुषंगाने मनुष्याच्या स्वभावातील परिवर्तन यांचा मागोवाही त्यांनी घेतला आहे. निदा फाजलींनी आपली दुःखे बाजूस सारून कुठलीही कटुता न येऊ देता सकारात्मक दृष्टिकोनातून गद्य-पद्य सर्जन केले.
उत्कृष्ट गीतकारासाठी निदा फजली यांना [[फिल्मफेअर} आणि झी सिनेचे नामांकन मिळाले होते, पण हे पुरस्कार त्यांना मिळाले नाहीत.
निदा फाजली यांची पुस्तके
- दीवारों के बीच
- दुनिया जिसे कहते हैं
पुरस्कार
- पद्मश्री (२०१३)
- सुर चित्रपटातील ‘आ भी जा’ या गाण्यासाठी बॉलिवुडचा उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार (२००३)
- उत्कृष्ट दूरचित्रवाणी गीतकाराचा इंडियन टेली पुरस्कार
- ‘सुर’मधील गीतांसाठी स्टार स्क्रीन पुरस्कार (२००३)
- खोया हुवा सच या उर्दू काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९९८)
(अपूर्ण)