Jump to content

"आदित्य सरपोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आदित्य सरपोतदार हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते मराठी चित...
(काही फरक नाही)

१४:१३, १२ मे २०१६ ची आवृत्ती

आदित्य सरपोतदार हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते मराठी चित्रपटसृष्टीचे शिल्पकार नानासाहेब सरपोतदार यांचे पणतू, निर्माते गजानन सरपोतदार यांचे नातू आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्वर्यू अजय विश्वास सरपोतदार यांचे पुत्र आहेत. आदित्य सरपोतदार वयाच्या १७व्या वर्षी छायाचित्रण करू लागले, त्यांनी काही माहितीपटांची आणि लघुचित्रपटांची निर्मिती केली आणि २००८ साली ‘उलाढाल’ नावाच्या भव्य मराठी चित्रपट दिग्दर्शित केला.

आदित्य सरपोतदार यांचे चित्रपट

  • उलाढाल (दिग्दर्शन)
  • क्लासमेट्स (दिग्दर्शन)
  • नारबाची वाडी (दिग्दर्शन)
  • बाळकडू (दिग्दर्शन)
  • सतरंगी रे (निर्मिती)