"जिम थॉर्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: जिम थॉर्प हा एक अतिशय गरीब रेड इंडियन एक-दोन बुकं शिकलेला अमेरिकन... |
(काही फरक नाही)
|
०७:०२, १० मे २०१६ ची आवृत्ती
जिम थॉर्प हा एक अतिशय गरीब रेड इंडियन एक-दोन बुकं शिकलेला अमेरिकन खेळाडू होता. मैदानावरच्या जबरदस्त आवडीतून समोर दिसेल तो खेळ खेळण्यात तो पटाईत झाला. खेळता खेळता तो डिकॅथलॉनसारख्या दहा खेळांच्या खेळीसाठी अमेरिकेच्या ऑलिंपिक पथकात निवडला गेला आणि त्याने १९१२ साली स्टॉकहोम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत जागतिक उच्चांकासह डिकॅथलॉन आणि पेंटॅथलॉनची सुवर्णपदके जिंकली.
जिम थॉर्पचा हा सन्मान वंशद्वेष्ट्या गौरवर्णीय अमेरिकन लोकांना सहन झाला नाही. त्यांनी थॉर्पकडे दुर्लक्ष केले. ऑलिंपिक स्पर्धेनंतर एक वर्षाने लोकांना समजले, की १९०९ आणि १९१० मध्ये बेसबॉलसारख्या त्या वेळी ऑलिंपिकशी संलंग्न नसलेल्या खेळाच्या लीग स्पर्धेत जिम थॉर्प एका स्थानिक क्लबकडून किरकोळ पैसे घेऊन खेळला होता. म्हणजेच तो धंदेवाईक खेळाडू होता. हा शोध लागताच शंभर टक्के सदस्य गौरवर्णीय असलेल्या अमेरिकन अॅथलेटिक संघटनेनं थोर्पवर नियमभंगाचा आरोप ठेवून त्याने मिळवलेली सर्व पारितोषिके परत घेतली आणि त्याची हेटाळणी केली.