"शफाअतखान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. शफाअतखान हे एक मराठी नाटककार आहेत. ते मुंबई विद्यापीठाच्या... |
(काही फरक नाही)
|
१७:२७, ८ मे २०१६ ची आवृत्ती
प्रा. शफाअतखान हे एक मराठी नाटककार आहेत. ते मुंबई विद्यापीठाच्या The Academy of Theatre Artsचे निदेशक आहेत.
शफाअतखान यांनी पूर्वी "क' नावाचा दीर्घांक लिहिला होता. त्याचे संपादन करून त्याची एकांकिका केली आणि ती गाजली. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनीच ती केली होती. या लेखनात त्यांना दोन अंकी नाटकाच्या शक्यता दिसल्या आणि याचे नाटक करायचे, असे त्यांनी ठरवले. त्यानुसार अनावश्यक आणि जुना झालेला भाग वगळून, तर काही पुनर्लेखन करून ‘शोभायात्रा’ हे नवे नाटक तयार झाले. या नाटकाला २००३ साली मॅजेस्टिक प्रकाशनचा जयवंत दळवी स्मृती पुरस्कार मिळाला. २००८ साली या नाटकाचे पुनरागमन झालेे, त्यावेळी अनुजा साठे यांनी त्यात नायिकेची भूमिका केली होती.
शफाअतखान यांची गाजलेली नाटके
- काहूर (एकांकिका)
- किस्से
- गांधी आडवा येतो
- Farce of Geometry
- टाइमपास
- देख तमाशा देख (हिंदी चित्रपट-कथालेखन, २०१४)
- पोपटपंची
- मुंबईचे कावळे (१९७६)
- राहिले दूर घर माझे (या नाटकाचे २००१ सालापर्यंत ९५ प्रयोग झाले होते.)
- शोभायात्रा (२००१ सालापर्यंत या नाटकाचे १७६ प्रयोग झाले होते.)