"वाहन विमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २८: ओळ २८:
==तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी इन्शुरन्स)==
==तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी इन्शुरन्स)==
बर्‍याच रस्ते अपघातांमध्ये वाहनचालक व ते वाहन याव्यतिरिक्त इतर वाहने, व्यक्ती व संपत्ती यांचे नुकसान होते. सध्या वाहन विम्यामध्ये या इतर बाबींच्या खर्च समाविष्ट नसू शकतो. अश्या वेळेस तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी इन्शुरन्स) कामी येतो. तृतीय पक्ष विम्यामध्ये तुम्ही व तुमचे वाहन यांचा समावेश नसतो. तुमच्यामुळे तृतीय पक्षाचे झालेले नुकसान व त्यामुळे निर्माण होणारी कायदेशीर जबाबदारी यांची काळजी घेण्याचे काम तृतीय पक्ष विमा करतो.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.loksatta.com/arthasatta-news/what-should-do-third-party-claim-every-one-know-32554/ |शीर्षक=थर्ड पार्टी क्लेम (तृतीय पक्ष विमा) काय ते जाणून घ्या |प्रकाशक=लोकसत्ता.कॉम |दिनांक=२६ डिसेंबर २०१२| प्राप्त दिनांक=}}</ref> या विम्यामुळे तृतीय पक्षाला होणार्‍या आर्थिक भुर्दंडापासून वाचविता येते. बर्‍याच देशांमध्ये वाहनधारकांना वाहन खरेदीवेळी तृतीय पक्ष विमा विकत घेणे बंधनकारक आहे. तृतीय पक्ष विमा हा वाहन विम्यासोबत किंवा वेगळा विकत घेता येऊ शकतो.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.esakal.com/esakal/20100425/4698692849804250859.htm|शीर्षक= वाहन विमा व तृतीय पक्ष दावा |प्रकाशक=सकाळ.कॉम|दिनांक=२५एप्रिल २०१० | प्राप्त दिनांक=}}</ref>

===थर्ड पार्टी व संपूर्ण विम्यातील फरक===
थर्ड पार्टी विम्यात वाहन सोडून त्याचा चालक, क्‍लीनर, प्रवासी किंवा हमाल यांना; तसेच इतर वाहने व मालमत्ता यांच्या नुकसानीची न्यायालयामार्फत भरपाई मिळू शकते. संपूर्ण विम्यात वरील संरक्षणासह स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते. सर्वसाधारण विम्यात वाहनमालकाकडून हवी असलेली भरपाई न्यायालयात दावा करून मिळवावी लागते, तर वाहनाची अपघातामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वाहनमालकास विमा कंपनीकडून दावा करून घ्यावी लागते.

==संदर्भ==
==संदर्भ==

२०:४३, ७ मे २०१६ ची आवृत्ती

वाहन विमा म्हणजे काय?

वाहन विमा हा कार, ट्रक, मोटारसायकल व इतर वाहनांच्या संरक्षणासाठी काढलेला विमा होय. या विम्याचा प्राथमिक उद्देश हा रहदारीच्या अपघातांपासून होणारे वाहनाचे/वाहनांचे नुकसान व वाहनचालकाला वा अपघातात सापडल्याने इतर व्यक्तीला झालेल्या शारीरिक इजा यांपासून आर्थिक सुरक्षा पुरवणे हा आहे. वाहन विमा हा रहदारीच्या अपघातांमुळे निर्माण होणार्‍या अन्य काही दायित्वांपासूनही आर्थिक सुरक्षा पुरवतो. वाहन विम्याच्या विशिष्ट अटी या प्रत्येक विभागाच्या कायदेशीर तरतुदीनुसार बदलतात. काही प्रकारचे वाहन विमा हे रस्ते अपघातांव्यतिरिक्त कारणांमुळे होणारे वाहनाचे नुकसान व चोरी यांपासूनही आर्थिक सुरक्षा प्रदान करतात.[१]

वाहन विम्याची गरज:

आजच्या जमान्यामध्ये महागड्या गाड्या वापरणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. रस्ते अपघातांमुळे होणारे वाहनाचे नुकसान व अपघातामध्ये समाविष्ट व्यक्तींच्या उपचाराचा खर्च यामुळे खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. बर्‍याच वाहनधारकांना हा आर्थिक खर्च पेलणे कठीण असते. म्हणूनच वाहनधारकांसाठी ही एक चिंतेची बाब असते. बरेच लोकं या भीतीमुळे स्वतःचे वाहन विकत घेणे टाळतात. वाहनधारकांची ही चिंता मिटवण्याचे काम वाहन विमा करतो.[२]

वाहन विमा हा अपघातामुळे निर्माण होणार्‍या समस्यांमधील आर्थिक बाजू सांभाळतो. त्यामुळे वाहन विमा असलेली व्यक्ती ही विनाचिंता वाहन वापरण्याचा आनंद लुटू शकते. एखाद्या गोष्टीमधील जोखीम ती गोष्ट वापरणाऱ्या सर्वांमध्ये विभागणे हे विम्याचे सर्वसाधारण सूत्र इथेही वापरले जाते.

वाहन विम्याचा इतिहास:

रोड ट्रॅफिक अॅक्ट १९३० नुसार इंग्लंडमध्ये वाहन विमा हा सर्वप्रथम अनिवार्य केला गेला. त्यानंतर जर्मनीने १९३९ साली असा कायदा केला.

वाहन विम्यामधील समाविष्ट बाबी:

वाहन विम्यामध्ये खालीलपैकी काही किंवा सर्व बाबींचा समावेश असतो.

  1. वाहन विमाधारक व्यक्ती (वैद्यकीय खर्च)
  2. वाहन विमाधारकामुळे झालेले मालमत्तेचे नुकसान
  3. विमाधारक वाहनाचे नुकसान
  4. थर्ड पार्टी (वाहन व व्यक्ती, मालमत्तेचे नुकसान व शारीरिक इजा) व थर्ड पार्टी, आग व चोरी
  5. विमाधारक वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च (अपघातात कोणाचीही चूक असली तरीही)
  6. दुसरे वाहन भाड्याने घेण्याचा खर्च (जर विमाधारकाच्या वाहनाचे नुकसान झाले असेल तर)
  7. अपघातग्रस्त वाहन अपघाताच्या जागेपासून दुरुस्तीच्या जागेपर्यंत घेऊन जाण्याचा खर्च
  8. अपघातामध्ये समाविष्ट इतर विमा नसलेल्या वाहनचालकांचा वैद्यकीय खर्च

विभिन्न विमा पॉलिसी मध्ये वेगवेगळ्या बाबींचा अंतर्भाव असू शकतो.[३] उदा. चोरी, आगीमुळे होणारे नुकसान, व अपघातांमुळे होणारे नुकसान यांसाठी वेगवेगळा वाहन विमा असू शकतो.

अतिरिक्त विमा:

अतिरिक्त विमा म्हणजे प्रत्येक वेळा जेव्हा वाहन दुरुस्त केले जाते तेव्हा ठरावीक रक्कम विमा कंपनीकडून दुरुस्तीच्या खर्चापोटी मिळते. परंतु ही रक्कम विमाधारकाला न देता थेट वाहन दुरुस्त करणार्‍याला बिलापोटी दिली जाते. अर्थात ही रक्कम किती असावी याला कमाल मर्यादा आहे. जर वाहन दुरुस्तीचे बिल या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आले तर उर्वरित रक्कम वाहनधारकाला भरावी लागते. ही कमाल मर्यादा वाहन विमा धारकाने घेतलेल्या पॉलिसीनुसार बदलते. अधिक कमाल मर्यादा असणाऱ्या पॉलिसीचा हप्तासुद्धा अधिक असतो.

तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी इन्शुरन्स)

बर्‍याच रस्ते अपघातांमध्ये वाहनचालक व ते वाहन याव्यतिरिक्त इतर वाहने, व्यक्ती व संपत्ती यांचे नुकसान होते. सध्या वाहन विम्यामध्ये या इतर बाबींच्या खर्च समाविष्ट नसू शकतो. अश्या वेळेस तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी इन्शुरन्स) कामी येतो. तृतीय पक्ष विम्यामध्ये तुम्ही व तुमचे वाहन यांचा समावेश नसतो. तुमच्यामुळे तृतीय पक्षाचे झालेले नुकसान व त्यामुळे निर्माण होणारी कायदेशीर जबाबदारी यांची काळजी घेण्याचे काम तृतीय पक्ष विमा करतो.[४] या विम्यामुळे तृतीय पक्षाला होणार्‍या आर्थिक भुर्दंडापासून वाचविता येते. बर्‍याच देशांमध्ये वाहनधारकांना वाहन खरेदीवेळी तृतीय पक्ष विमा विकत घेणे बंधनकारक आहे. तृतीय पक्ष विमा हा वाहन विम्यासोबत किंवा वेगळा विकत घेता येऊ शकतो.[५]

थर्ड पार्टी व संपूर्ण विम्यातील फरक

थर्ड पार्टी विम्यात वाहन सोडून त्याचा चालक, क्‍लीनर, प्रवासी किंवा हमाल यांना; तसेच इतर वाहने व मालमत्ता यांच्या नुकसानीची न्यायालयामार्फत भरपाई मिळू शकते. संपूर्ण विम्यात वरील संरक्षणासह स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते. सर्वसाधारण विम्यात वाहनमालकाकडून हवी असलेली भरपाई न्यायालयात दावा करून मिळवावी लागते, तर वाहनाची अपघातामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वाहनमालकास विमा कंपनीकडून दावा करून घ्यावी लागते.

संदर्भ

  1. ^ http://wegvan.in/2014/09/10/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://aplapune.com/home/home/detail_news/3210/id. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.turtlemint.com/car-insurance. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.loksatta.com/arthasatta-news/what-should-do-third-party-claim-every-one-know-32554/. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.esakal.com/esakal/20100425/4698692849804250859.htm. Missing or empty |title= (सहाय्य)