Jump to content

"एम.एन. कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. एम.एन. कामत, पूर्ण नाव माधव नारायण कामत, (जन्म : उभादांडा, रत्‍...
(काही फरक नाही)

१५:१४, ७ मे २०१६ ची आवृत्ती

प्रा. एम.एन. कामत, पूर्ण नाव माधव नारायण कामत, (जन्म : उभादांडा, रत्‍नागिरी जिल्हा, ५ मे, इ.स. १८९७; मृत्यू: ??) हे एक मराठी कृषिरोगशास्त्रज्ञ होते.

कामतांना लहानपणापासून झाडाझुडपांची आणि बागकामाची आवड होती. त्यांनी १९१९ साली पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून बी.एजी. (बॅचलर ऑफ अॅग्रिकल्चर) ही डिग्री मिळवली आणि त्याच महाविद्यालयात असिस्टंट मायकोलॉजिस्ट म्हणून नोकरी सुरू केली. त्यांच्या तेथील वास्तव्यात सर्वप्रथम त्यांनी उत्तर कोकणातील सुपारीवरील रोगाच्या निर्मूलन आणि नियंत्रणासाठी जनजागृती मोहीम हातात घेतली आणि बोरेक्स मिश्रणाचा वापर करण्याचा प्रघात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय केला.

त्यानंतर प्रो. कामत यांनी वाटाण्यावरील ड्राय राट आणि विल्ट याप्रमाणे लिंबावरील गॉयमासिसवर काम करून अनेक निबंध प्रकाशित केले. द्राक्षावरील पावडरीसदृश मिल्ड्यू रोग शोधून त्यावर गंधकाच्या पावडरचा शिडकावा करून त्यांनी नाशिक-पुण्यातील द्राक्षशेतीचा त्या रोगापासून खात्रीपूर्वक बचाव केला.

प्रा. कामत यांनी मिनिसोटा विद्यापीठातून प्लँट पॅथालॉजी आणि मायकॉलॉजी या विषयात मास्टर्स पदवी संपादन केली. त्यांनी गव्हावरील तांबेरा रोग, ज्वारीवरील स्मट (कणसे काळी पडण्याचा रोग, काजळी रोग) आणि आंबा, जिरे, वाटाणा आणि सुपारी यावरील ‘पावडरी मिल्ड्यू’ रोग या रोगांच्या निर्मूलनाचे अनेक प्रकल्प राबवले. त्यांनी मुंबईमधील कवकांचे (बुरशीचे) ग्रंथरूपात संकलन केले. त्याचप्रमाणे केळ्यांवरील फ्युझेरियम नावाच्या बुरशीचा अभ्यास केला.

प्रा. कामत यांनी भातावरील धोकादायक रोग ‘ब्लास्ट ऑफ राइस’ यावर संशोधनपूर्वक अभ्यास करून त्या रोगाला प्रतिरोध करणारे वाण शोधून काढले. १९५२ पर्यंत प्रा. कामत पुण्यातील कृषिमहाविद्यालयात प्लॅन्ट पॅथॉलॉजीचे प्राध्यापक होते.

१९५३ साली त्यांनी प्रॅक्टिकल्स इन प्लॅन्ट पॅथॉलॉजी या विषयावरील त्याचे पहिले पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक या विषयावरील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरले.

कालांतराने प्रा. कामत पुणे विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागात रुजू झाले. त्यानंतर कामत आघारकर संशोधन संस्थेत प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून मायकोलॉजी (बुरशीविज्ञान) आणि पॅथालॉजी (रोगशास्त्र) विभागाचे काम बघू लागले. या वास्तव्यात त्यांनी या संस्थेत ‘स्कूल ऑफ मायकॉलॉजीची’ सुरुवात केली. त्यांचे अ‍ॅस्कोमायसिटिस (A large class of higher fungi)वर शोधकार्य होते. त्यांनी कवकाच्या (बुरशीच्या) ९ प्रजाती आणि ३०० जाती स्थापित केल्या. त्यांनी मायकॉलॉजी अॅन्ड प्लॅन्ट पॅथॉलॊजी या विषयावर पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३० विद्यार्थ्यांना एम.एस्‌सी. आणि पीएच.डी.च्या पदव्या मिळाल्या आहे.

प्रा.एम.एन. कामत यांनी लिहिलेली पुस्तके

  • Hand-Book of Mycology, By M.N. Kamat. (आकृत्या - वत्सला डी. कामत आणि डी.एन. नेगपुरे, १९७०)
  • Hand-book of Mycology: Basidiomycetes & fungi-imperfecti (१९६१)
  • Hand-book of Mycology: Phycomycetes & Ascomycetes (१९५९)
  • Hand-book of Tropical Crop Diseases (१९५८)
  • Introductory Plant Pathology (३री आवृत्ती, १९६७)
  • Em. En. Kamat Krtigalu (Works of MN Kamat, १९९१)
  • Practical Plant Pathology (१९५३)