"रंजन साळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: रंजन साळवी (निधन : इ.स. २०००), मूळ नाव रंगराव साळवी, हे एक नृत्यदिग्द... |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
मूळचा नगर जिल्ह्यातला असलेला रंगराव साळवी नावाचा तरुण गावगावच्या जत्रेत, मेळ्यात नाच बसवत हिंडायचा. बुटकी आकृती, कुरळे केस, गव्हाळ रंग आणि डोळ्यावर चश्मा. राम यादव या त्याच्या मित्राने रंगरावला पुण्यातच एका चित्रपटाची तयारी करत असलेल्या दिग्दर्शक अनंत माने यांच्याकडे नेले आणि डान्समास्तर म्हणून सादर केले. अनंत माने यांनी या तरुणाकडे पाहून, ‘मास्तर हे गाणे ऐका आणि बसवा डान्स’ अशी आज्ञा दिली. रंगरावने गाणे नीट ऐकले आणि काही मिनिटांतच पँट सावरून दणादण पहिल्या कडव्याच्या स्टेप्स बसवल्या. ते गाणे होते, ‘कसं काय पाटील बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?’... इथून रंगराव साळवींचा प्रवास चालू झाला. या प्रवासात ‘उभ्या महाराष्ट्राचे रंजन करणारा कलाकार, तू रंगराव कसले नाव लावतोस?’ असे विचारत भावगीत गायक [[दत्ता वाळवेकर]] यांनी रंगरावचा ‘रंजन’ केला. |
मूळचा नगर जिल्ह्यातला असलेला रंगराव साळवी नावाचा तरुण गावगावच्या जत्रेत, मेळ्यात नाच बसवत हिंडायचा. बुटकी आकृती, कुरळे केस, गव्हाळ रंग आणि डोळ्यावर चश्मा. राम यादव या त्याच्या मित्राने रंगरावला पुण्यातच एका चित्रपटाची तयारी करत असलेल्या दिग्दर्शक अनंत माने यांच्याकडे नेले आणि डान्समास्तर म्हणून सादर केले. अनंत माने यांनी या तरुणाकडे पाहून, ‘मास्तर हे गाणे ऐका आणि बसवा डान्स’ अशी आज्ञा दिली. रंगरावने गाणे नीट ऐकले आणि काही मिनिटांतच पँट सावरून दणादण पहिल्या कडव्याच्या स्टेप्स बसवल्या. ते गाणे होते, ‘कसं काय पाटील बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?’... इथून रंगराव साळवींचा प्रवास चालू झाला. या प्रवासात ‘उभ्या महाराष्ट्राचे रंजन करणारा कलाकार, तू रंगराव कसले नाव लावतोस?’ असे विचारत भावगीत गायक [[दत्ता वाळवेकर]] यांनी रंगरावचा ‘रंजन’ केला. |
||
१९४५ ते ७५ या काळातले मराठी चित्रपटांची कथानके तमाशा या विषयावर असायचे. चित्रपटात एखादा आडदांड ज्युनिअर पाटील (जी भूमिका बर्याचदा सूर्यकांत/चंद्रकांत/अरुण सरनाईक करायचे) आणि हळवी तमासगीर बाई यांची प्रेमकथा असायची. पाटलाची घरात झुरणारी, सबंध सिनेमात दोनेक किरकोळ संवाद असलेली घरंदाज बायको. आणि तरण्या पाटलाच्या पराक्रमाने, झुरून झुरून मरणी लागलेला, करवादलेला म्हातारा सीनिअर पाटीलही असायचा .अशा ठरावीक साच्यात फिट्ट बसलेल्या इ.स. १९५०च्या आसपासच्या काळातल्या मराठी चित्रपटांचे नृ्त्यदिग्दर्शन रंजन साळवी यांचे असायचे. |
|||
रंजन साळवी यांनी सुमारे १५० मराठी चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले. |
|||
रंजन साळवी यांनी सुमारे १७५ मराठी चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले. त्यांनी [[उषा नाईक]], [[जयश्री गडकर]], [[जयश्री टी]], [[मधु कांबीकर]], [[माया जाधव]], [[लीला गांधी]], [[वत्सला देशमुख]], [[सरला येवलेकर]] अशांसारख्या सुमारे दीडशे नायिकांना आणि कित्येक हजार ज्युनिअर आर्टिस्टांना नृत्याचे धडे दिले. |
|||
‘माझं घर माझा संसार’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रंजन साळवींचे ब्लडप्रेशर वाढले. पक्षाघाताचा झटका आला. पुढची आठ-नऊ वर्षे त्यांनी अंथरुणावर काढली. पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यर्थ. अखेर साळवींनी आजाराशी व आर्थिक तंगीशी झुंजत शेवटचा श्वास पुण्यातल्या विश्रांतवाडी झोपडपट्टी भागातल्या आंब्रे चाळीतच घेतला. |
|||
==रंजन साळवी यांचे नृत्य दिग्दर्शन असलेले मराठी चित्रपट== |
==रंजन साळवी यांचे नृत्य दिग्दर्शन असलेले मराठी चित्रपट== |
||
* केला इशारा जाता जाता |
|||
* चानी |
|||
* पिंजरा |
|||
* माझं घर माझा संसार |
|||
* लक्ष्मी |
|||
* सवाल माझा ऐका |
|||
* सांगत्ये ऐका |
|||
* सुगंधी कट्टा |
|||
* सुशीला |
|||
[[वर्ग:मराठी चित्रपट]] |
|||
[[वर्ग:नृत्यदिग्दर्शक]] |
२३:४५, ६ मे २०१६ ची आवृत्ती
रंजन साळवी (निधन : इ.स. २०००), मूळ नाव रंगराव साळवी, हे एक नृत्यदिग्दर्शक होते.
मूळचा नगर जिल्ह्यातला असलेला रंगराव साळवी नावाचा तरुण गावगावच्या जत्रेत, मेळ्यात नाच बसवत हिंडायचा. बुटकी आकृती, कुरळे केस, गव्हाळ रंग आणि डोळ्यावर चश्मा. राम यादव या त्याच्या मित्राने रंगरावला पुण्यातच एका चित्रपटाची तयारी करत असलेल्या दिग्दर्शक अनंत माने यांच्याकडे नेले आणि डान्समास्तर म्हणून सादर केले. अनंत माने यांनी या तरुणाकडे पाहून, ‘मास्तर हे गाणे ऐका आणि बसवा डान्स’ अशी आज्ञा दिली. रंगरावने गाणे नीट ऐकले आणि काही मिनिटांतच पँट सावरून दणादण पहिल्या कडव्याच्या स्टेप्स बसवल्या. ते गाणे होते, ‘कसं काय पाटील बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?’... इथून रंगराव साळवींचा प्रवास चालू झाला. या प्रवासात ‘उभ्या महाराष्ट्राचे रंजन करणारा कलाकार, तू रंगराव कसले नाव लावतोस?’ असे विचारत भावगीत गायक दत्ता वाळवेकर यांनी रंगरावचा ‘रंजन’ केला.
१९४५ ते ७५ या काळातले मराठी चित्रपटांची कथानके तमाशा या विषयावर असायचे. चित्रपटात एखादा आडदांड ज्युनिअर पाटील (जी भूमिका बर्याचदा सूर्यकांत/चंद्रकांत/अरुण सरनाईक करायचे) आणि हळवी तमासगीर बाई यांची प्रेमकथा असायची. पाटलाची घरात झुरणारी, सबंध सिनेमात दोनेक किरकोळ संवाद असलेली घरंदाज बायको. आणि तरण्या पाटलाच्या पराक्रमाने, झुरून झुरून मरणी लागलेला, करवादलेला म्हातारा सीनिअर पाटीलही असायचा .अशा ठरावीक साच्यात फिट्ट बसलेल्या इ.स. १९५०च्या आसपासच्या काळातल्या मराठी चित्रपटांचे नृ्त्यदिग्दर्शन रंजन साळवी यांचे असायचे.
रंजन साळवी यांनी सुमारे १७५ मराठी चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले. त्यांनी उषा नाईक, जयश्री गडकर, जयश्री टी, मधु कांबीकर, माया जाधव, लीला गांधी, वत्सला देशमुख, सरला येवलेकर अशांसारख्या सुमारे दीडशे नायिकांना आणि कित्येक हजार ज्युनिअर आर्टिस्टांना नृत्याचे धडे दिले.
‘माझं घर माझा संसार’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रंजन साळवींचे ब्लडप्रेशर वाढले. पक्षाघाताचा झटका आला. पुढची आठ-नऊ वर्षे त्यांनी अंथरुणावर काढली. पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यर्थ. अखेर साळवींनी आजाराशी व आर्थिक तंगीशी झुंजत शेवटचा श्वास पुण्यातल्या विश्रांतवाडी झोपडपट्टी भागातल्या आंब्रे चाळीतच घेतला.
रंजन साळवी यांचे नृत्य दिग्दर्शन असलेले मराठी चित्रपट
- केला इशारा जाता जाता
- चानी
- पिंजरा
- माझं घर माझा संसार
- लक्ष्मी
- सवाल माझा ऐका
- सांगत्ये ऐका
- सुगंधी कट्टा
- सुशीला