"रंजन साळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: रंजन साळवी (निधन : इ.स. २०००), मूळ नाव रंगराव साळवी, हे एक नृत्यदिग्द... |
(काही फरक नाही)
|
२३:२५, ६ मे २०१६ ची आवृत्ती
रंजन साळवी (निधन : इ.स. २०००), मूळ नाव रंगराव साळवी, हे एक नृत्यदिग्दर्शक होते.
मूळचा नगर जिल्ह्यातला असलेला रंगराव साळवी नावाचा तरुण गावगावच्या जत्रेत, मेळ्यात नाच बसवत हिंडायचा. बुटकी आकृती, कुरळे केस, गव्हाळ रंग आणि डोळ्यावर चश्मा. राम यादव या त्याच्या मित्राने रंगरावला पुण्यातच एका चित्रपटाची तयारी करत असलेल्या दिग्दर्शक अनंत माने यांच्याकडे नेले आणि डान्समास्तर म्हणून सादर केले. अनंत माने यांनी या तरुणाकडे पाहून, ‘मास्तर हे गाणे ऐका आणि बसवा डान्स’ अशी आज्ञा दिली. रंगरावने गाणे नीट ऐकले आणि काही मिनिटांतच पँट सावरून दणादण पहिल्या कडव्याच्या स्टेप्स बसवल्या. ते गाणे होते, ‘कसं काय पाटील बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?’... इथून रंगराव साळवींचा प्रवास चालू झाला. या प्रवासात ‘उभ्या महाराष्ट्राचे रंजन करणारा कलाकार, तू रंगराव कसले नाव लावतोस?’ असे विचारत भावगीत गायक दत्ता वाळवेकर यांनी रंगरावचा ‘रंजन’ केला.
रंजन साळवी यांनी सुमारे १५० मराठी चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले.