"साथीचे आजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: एकाच गावात राहणार्या बर्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव... |
(काही फरक नाही)
|
१६:५४, ५ मे २०१६ ची आवृत्ती
एकाच गावात राहणार्या बर्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत. पण वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर अशा साथीच्या रोगांची कारणे समजू लागली आणि त्यावर उपायही होऊ लागले. साठीचे रोग त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात, डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात, किंवा आजार झालेला रुग्ण दुसर्या व्यक्तीच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आल्याने पसरतात.
सामान्यपणे होणार्या अशा साथीच्या आजारांची ही जंत्री :
- इन्फ्ल्युएन्झा
- टायफॉईड
- डेंग्यू (डेंगी)
- देवी : डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी इ.स. १७९६मध्ये देवीवरील लस शोधली. नंतर जगभर लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पुण्यामध्ये १८०४मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी स्वत:ला आणि कुटुंबीयांना एका इंग्रज डॉक्टरकडून लस टोचवून घेतली होती. सुमारे पावणेदोनशे वर्षांमध्ये भारतीयांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांनांमुळे देवी रोगाचे उच्चाटन झाले. १७ मे १९७५ रोजी भारतात देवी झालेला अखेरचा रुग्ण होता. १९७७मध्ये या रोगाचे पृथ्वीवरून उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.
- धनुर्वात
- नारू : दूषित पाणी पिण्याने होणारा हा रोग आता भारतातून हद्दपार झाला आहे. २००१ सालानंतर भारतात नारूचा रोगी सापडलेला नाही.
- मलेरिया
- पोलिओ : इ.स. २००९पर्यंत जगात सर्वांत जास्त पोलिओग्रस्त रुग्ण भारतात होते. रुग्णांच्या लाळ-विष्ठा-शिंकेमार्फत पोलिओचे विषाणू हवा-अन्न-पाण्यातून सर्वत्र पसरतात. निदानासाठी या रोगाची निश्चित लक्षणे दिसत नाहीत. हा रोग बरा करण्यासाठी हमखास औषध नाही. हे लक्षात घेऊन भारतातील डॉक्टर, तसेच वैद्यकक्षेत्रात सतत कार्यरत असणारे ’पॅरामेडिकल‘ कर्मचारी, सामाजिक संस्था, राजकीय इच्छाशक्ती व वीस लाख स्वयंसेवक यांनी मोठ्या हिकमतीने भारत पोलिओमुक्त करण्यासाठी चंग बांधला. त्यांना यश मिळाले. पोलिओची एकही ’केस‘ १३ जानेवारी २०११ नंतर भारतात आढळलेली नाही. नंतरच्या तीन वर्षांत कुणालाही पोलिओ झाला नाही. साहजिक जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ रोजी भारत पोलिओमुक्त असल्याचे जाहीर केले.
- प्लेग
(अपूर्ण)