"वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे मुंबईतले वरळी येथील एक मैदान आह... |
(काही फरक नाही)
|
११:४६, ३ मे २०१६ ची आवृत्ती
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे मुंबईतले वरळी येथील एक मैदान आहे. इ.स. १९५७ साली बांधलेल्या या स्टॆडियममध्ये ५,००० प्रेक्षक बसू शकतात. हे स्टॆडियम २००५ साली वातानुकूलित झाल्याने इनडोअर झाले.
नॅशमल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया ही संस्था या स्टेडियमची देखभाल करते. या मैदानात टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बिलियर्ड्ज, कॅरम आणि कुस्त्यांचे सामने होतात. इंडियन बॅडमिंटन लीग, मुंबई मराठा संघांचे आणि यू-मुंबा कबड्डी संघाचे हे घर-मैदान आहे.
दारासिंग, किंगकाँग, रंधावा, गामा-गुंगा आणि अनेक देशी परदेशी मल्लांच्या कुस्त्या या मैदानावर झाल्या आहेत..