"मराठीतील कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →शब्दकोश |
No edit summary |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
शब्दकोशांची विभागणी एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक अशी करता येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने उर्दू-मराठी (श्रीपाद जोशी, एन.एस. गोरेकर), कन्नड-मराठी (पुंडलिकजी कातगडे), गुजराती-मराठी (भाऊ धर्माधिकारी), पाली-मराठी (बाबा भारती), मराठी-कन्नड (गुरुनाथ दिवेकर), मराठी-गुजराती (भाऊ धर्माधिकारी), मराठी-सिंधी (लछमन हर्दवाणी), तमीळ-मराठी (रमाबाई जोशी, पु. दि. जोशी), यांसारखे कोश प्रकाशित केले आहेत. |
शब्दकोशांची विभागणी एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक अशी करता येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने उर्दू-मराठी (श्रीपाद जोशी, एन.एस. गोरेकर), कन्नड-मराठी (पुंडलिकजी कातगडे), गुजराती-मराठी (भाऊ धर्माधिकारी), पाली-मराठी (बाबा भारती), मराठी-कन्नड (गुरुनाथ दिवेकर), मराठी-गुजराती (भाऊ धर्माधिकारी), मराठी-सिंधी (लछमन हर्दवाणी), तमीळ-मराठी (रमाबाई जोशी, पु. दि. जोशी), यांसारखे कोश प्रकाशित केले आहेत. |
||
==ज्ञनकोश/विश्वकोश== |
|||
[[श्रीधर व्यंकटेश केतकर]] यांनी तयार केलेला 'ज्ञानकोश' ही मराठी कोशवाङ्मयातील अत्यंत महत्त्वाची, ऐतिहासिक स्वरूपाची अद्वितीय कामगिरी आहे. ज्ञानकोश याचा अर्थ सर्व विद्याशाखांतील माहितीचा पद्धतशीरपणाने केलेला संग्रह. तो इथे नेमकेपणी पाहायला मिळतो. मराठीतील ज्ञानकोशांची संख्या आता शंभरच्या घरात गेली आहे. तीत मुलांचे ज्ञानकोश, सर्वसंग्राहक कोश, विषयज्ञानकोश अशी भरपूर विविधता आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर मोफ्त वाचता येतो. |
|||
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली 'मराठी विश्वकोशा'ची निर्मिती सुरू केली. 'विश्वकोश' हा मराठी माणसाला जागतिक पातळीवरचे ज्ञान आत्मसात करायला मदत करणारा ज्ञानकोश आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वविकासाशी, त्याच्या प्रगल्भतेशी साहित्याचा व संस्कृतीचा संबंध असतो याचे भान राखून विश्वकोशाची निर्मिती झाली आहे. १९७६मध्ये विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. इ.स.२०१६मध्ये विसावा खंड पूर्ण होऊन विश्वकोशाची मूळ योजना मार्गी लागेल.हाही ज्ञानकोश आंतरजालावर पहाता येतो, आणि तो सीडीरूपातही विकत मिळतो. |
|||
१०:५४, ३ मे २०१६ ची आवृत्ती
मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. शब्दकोश, ज्ञानकोश/विश्वकोश, चरित्रकोश, तिथिकोश, संख्यासंकेतकोश, सुविचारकोश, ग्रंथसूची, जंत्री आणि शकावली, निदेशपुस्तके, निर्देशिका, वार्षिके व पंचांगे, भौगोलिक कोश-ग्रामसूची, गॅझेटियर्स असे कोशांचे निरनिराळे प्रकार मराठीत आढळतात.
शब्दकोश
संख्येने सर्वाधिक, उपप्रकारांत सर्वाधिक आणि सर्वांच्या परिचयाचा कोशप्रकार म्हणजे शब्दकोश होय. मराठीतील निव्वळ शब्दकोशांची संख्या ४००च्या घरात जाईल. मराठी भाषेत स्वातंत्र्यपूर्व काळात १३४ तर स्वातंत्र्योत्तर काळात २७० पेक्षा अधिक शब्दकोश निर्माण झाले.
मराठीतील पहिला शब्दकोश म्हणजे विल्यम कॅरे यांनी १८१० मध्ये प्रकाशित केलेला 'मराठी-इंग्रजी कोश' (अ डिक्शनरी ऑफ दी मऱ्हाटा लँग्वेज). हा कोश पंडित विद्यानाथ (वैजनाथ शर्मा) यांच्या मदतीने तयार केल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. वैजनाथ शर्मा हे कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमधील मराठीचा प्रमुख पंडित होते. या कोशाची पृष्ठसंख्या ६५२ असून यात मराठी शब्द मोडी लिपीत व अर्थ इंग्लिश भाषेत दिला आहे.
दुसरा कोश लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी या लष्करी अधिकार्याने मुंबई येथे इ. स. १८२४ मध्ये प्रसिद्ध केला. या कोशाचे दोन भाग असून पहिल्या भागात मराठी शब्दांना इंग्लिश प्रतिशब्द देऊन दुसऱ्या भागात इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. कोशातील शब्दसंख्या आठ हजारपर्यंत आहे.
शब्दकोशांची विभागणी एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक अशी करता येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने उर्दू-मराठी (श्रीपाद जोशी, एन.एस. गोरेकर), कन्नड-मराठी (पुंडलिकजी कातगडे), गुजराती-मराठी (भाऊ धर्माधिकारी), पाली-मराठी (बाबा भारती), मराठी-कन्नड (गुरुनाथ दिवेकर), मराठी-गुजराती (भाऊ धर्माधिकारी), मराठी-सिंधी (लछमन हर्दवाणी), तमीळ-मराठी (रमाबाई जोशी, पु. दि. जोशी), यांसारखे कोश प्रकाशित केले आहेत.
ज्ञनकोश/विश्वकोश
श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी तयार केलेला 'ज्ञानकोश' ही मराठी कोशवाङ्मयातील अत्यंत महत्त्वाची, ऐतिहासिक स्वरूपाची अद्वितीय कामगिरी आहे. ज्ञानकोश याचा अर्थ सर्व विद्याशाखांतील माहितीचा पद्धतशीरपणाने केलेला संग्रह. तो इथे नेमकेपणी पाहायला मिळतो. मराठीतील ज्ञानकोशांची संख्या आता शंभरच्या घरात गेली आहे. तीत मुलांचे ज्ञानकोश, सर्वसंग्राहक कोश, विषयज्ञानकोश अशी भरपूर विविधता आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर मोफ्त वाचता येतो.
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली 'मराठी विश्वकोशा'ची निर्मिती सुरू केली. 'विश्वकोश' हा मराठी माणसाला जागतिक पातळीवरचे ज्ञान आत्मसात करायला मदत करणारा ज्ञानकोश आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वविकासाशी, त्याच्या प्रगल्भतेशी साहित्याचा व संस्कृतीचा संबंध असतो याचे भान राखून विश्वकोशाची निर्मिती झाली आहे. १९७६मध्ये विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. इ.स.२०१६मध्ये विसावा खंड पूर्ण होऊन विश्वकोशाची मूळ योजना मार्गी लागेल.हाही ज्ञानकोश आंतरजालावर पहाता येतो, आणि तो सीडीरूपातही विकत मिळतो.