"महाराष्ट्र मंडळ, कतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: कतार महाराष्ट्र मंडळाची स्थापना १९९५ सालच्या चैत्र महिन्यात दो... |
(काही फरक नाही)
|
१४:३६, २७ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
कतार महाराष्ट्र मंडळाची स्थापना १९९५ सालच्या चैत्र महिन्यात दोहा येथे झाली. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यात या 'चैत्रनास' या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मंडळातील सभासदांच्या कला गुणांना वाव करून देण्यासाठी मंडळाने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यावर सभासदांपैकी अनेकजण आपल्या कलाकृती गायन, संगीत, नृत्ये, नाटिका यांच्या माध्यमातून त्या दिवशी या सोहळ्यात सादर करतात.
या वर्षी-२०१६ साली, कतारच्या महाराष्ट्र मंडळाचा शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी 'चैत्रमास २०१६' हा स्नेहसंमेलन सोहळा दोहा स्थित एमईएस इंडियन स्कूलच्या हॉलमध्ये पार पडला. नवनवीन संकल्पना घेऊन आलेला हा सोहळा या वर्षीच्या कतार महाराष्ट्र मंडळाच्या अनेक उपक्रमातील दीर्घ काळ स्मरणात राहील असा ठरला.
२०१६ साली चैत्र महिन्याचा कालावधी इग्रजी महिन्यानुसार २४ मार्च ते २२ एप्रिल पर्यंत होता. याच महिन्यात कतार महाराष्ट्र मंडळाची स्थापना देखील १९९५ सालात झाली होती. २० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने 'चैत्रमास २०१६' भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला गेला. सालाबादप्रमाणे यंदाही या सोहळ्यात समस्त मराठी समाज एकवटला होता. यंदाच्या या सोहळ्याला आपले कला गुण सादर करण्यासाठी सहभाग घेणाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यावर्षी तब्बल २३७ प्रवेशिकांची विक्रमी नोंद झाली होती. यात बालवयातील मुलांसहित ते अगदी ७३ वर्षांपर्यंतच्या सभासदांचा देखील समावेश होता. दुपारी दोन वाजता सुरु झालेला हा कला सादरीकरणाचा कार्यक्रम रात्री ११ वाजेपर्यंत चालला. संपूर्ण सोहळ्यादरम्यान समितिचे सर्व पुरुष व महिला सदस्य पेशवेकालीन पुणेरी धाटणीच्या महाराष्ट्रीय वेशभूषेत होते.