Jump to content

"विलायती चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विलायती चिंच ऊर्फ इमली हे वाटाण्याच्या फॅबॅसी (Fabaceae) कुळातले फुले,...
(काही फरक नाही)

२३:५४, ११ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

विलायती चिंच ऊर्फ इमली हे वाटाण्याच्या फॅबॅसी (Fabaceae) कुळातले फुले, फळे देणारे शेगाझाड आहे. याचे शास्त्रीय नाव पिथेसेलोनियम डलसी (Pithecellobium dulce) असे आहे.

लालसर, गुलाबी वर्तुळाकार आकाराचे आकडे असलेल्या चिंचेचे हे झाड म्हणजे एक हिरवागार सदाहरित वृक्ष आहे.. हा वृक्ष मूळचा पॅसिफिक महासागरानजीकचा रहिवासी आहे. म्हणूनच याचे नाव विलायती चिंच असे पडले. याचे इंग्रजी नाव ‘मनिला टॅमरिंड’. हे झाड साधारण १५ ते २० मीटर उंच होते. ह्याचे खोड काळपट करड्या रंगाचे असते. त्याच्या फांद्या दूरवर पसरत जात असल्याने त्याचा पर्णसंभार मोठा विस्तारलेला असतो. त्यामुळे या झाडाची चांगली सावली पडते.

विलायती चिंचेच्या झाडाची त्याची पाने नाजूक व हिरवीगार असतात. लहान पानाच्या मुळाशी बाजूला दोन टोकदार काटे असतात नवीन पाने येत असताना जुनी पाने गळून पडतात. त्यामुळे झाड सतत हिरवेगार दिसते. झाडाला पिवळट दुधट पांढऱ्या रंगाची फुले येऊन पुढे शेंगा येतात. या शेंगा म्हणजेच विलायती चिंचा. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नवी पालवी आली तरी इमल्या फेब्रुवारीपर्यंत तयार होतात.