Jump to content

"एकचक्रा गणेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एकचक्रानगरी हे नाव महाभारतातील पांडवांशी संबंधित आहे. या गावी भ...
(काही फरक नाही)

२१:३०, ७ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

एकचक्रानगरी हे नाव महाभारतातील पांडवांशी संबंधित आहे. या गावी भीमाने बकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केली.

नागपूर-वर्धा रस्त्यावर वर्ध्यापासून अंदाजे २५ कि.मी. अंतरावर केळझर नावाचे गाव आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रा नगरी म्हणून ओळखले जायचे, अशी समजूत आहे. गावाजवळच एक किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच उंच जागेवर हे एकचक्रा गणेशाचे देऊळ आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुरवधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.

मंदिराच्या मागच्या बाजूला पुष्करणीसारखी एक विहीर आहे. ही विहीर चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची एक काळ्या दगडाची मूर्ती सापडली होती. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची व सुंदर असून, या गणेशाच्या दर्शनाला परगावाहून अनेक लोक येतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे.

एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रा नगरीमध्ये केला, असेही सांगितले जाते.