"गणेश देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. गणेश नारायणदास देवी (जन्म :१९५०) हे एक भारतीय साहित्य समीक्षक आ... |
(काही फरक नाही)
|
२०:२८, ३१ मार्च २०१६ ची आवृत्ती
डॉ. गणेश नारायणदास देवी (जन्म :१९५०) हे एक भारतीय साहित्य समीक्षक आणि भाषाशास्त्रज्ञ आहेत. बडोद्याच्या भाषा संशोधन कॆंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.
डॉ. गणेश देवी हे बडॊद्याच्या सयाजीराव गायकवाड़ विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक होते. डॉ. गणेश आणि त्यांची पत्नी सुरेखादेवी 'भाषा' नावाची एक बिनसरकारी संस्था चालवतात. ही संस्था गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात तेथील बोलीभाषांवर काम करते.
भारतातील बोलींवर आणि जिवंत व नष्ट होत चाललेल्या ७८० भाषांवर संशोधन करून लिहिलेला गणेश देवी यांचा पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ इ.स. २०१०मध्ये प्रसिद्ध झाला.
डॉ. गणेश देवी यांना त्यांच्या साहित्यातील आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीसाठी इ.स. २०१४ साली पद्मश्री प्रदान झाली.