Jump to content

"सिसिलिया कार्व्हालो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो या एम.ए. पीएच.डी, डीएचई. असून वसईतील स...
(काही फरक नाही)

२०:४४, ११ मार्च २०१६ ची आवृत्ती

प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो या एम.ए. पीएच.डी, डीएचई. असून वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. तेथे त्या मराठी विषयाचे अध्यापनही करतात. तिथल्या विद्यार्थ्यांना त्या मुंबई विद्यापीठाच्या पीएचडीसाठीचे मार्गदर्शन करतात.

डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे विविध साहित्य प्रकाशित झाले असून काव्याबरोबरच कथा, ललित, बालवाङ्मय, संकलन, लोकसाहित्य असे अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. ‘उन्मेश’, ‘अंतर्यामी’, ‘सूर्य किरणात आला’, ‘पंख’, ‘माणूस उकरून काढावा लागतोय’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची ‘प्रेमांजली’ व ‘मृद्वेणा’ ही अनुवादित पुस्तके आहेत.

सिसिलिया कार्व्हालो यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार लाभला आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान अशा २५हून अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.

इटली, जर्मनी, चीन असा देश-विदेशात त्यांचा प्रवास झाला आहे. कार्व्हालो यांनी उच्च माध्यमिक पाठय़पुस्तक मंडळावर व बालभारती पाठय़पुस्तक मंडळावर संपादक म्हणून काम केले आहे.

डॉ. सिसिलिया कार्व्हालो या २८ फेब्रुवारी २०१६ रोजी बेळगावात झलेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.