"दिनकर गांगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ६: | ओळ ६: | ||
==दिनकर गांगल यांनी लिहिलेली पुस्तके== |
==दिनकर गांगल यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
⚫ | |||
* कॅन्सर डायरी (लेखन-संपादन) |
* कॅन्सर डायरी (लेखन-संपादन) |
||
* भारतातील स्टेनलेस स्टील संस्कृतीचे जनक (सहलेखिका शरयू ठाकूर) |
|||
⚫ | |||
* शोध मराठीपणाचा (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) |
* शोध मराठीपणाचा (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) |
||
* स्क्रीन इज द वर्ल्ड |
* स्क्रीन इज द वर्ल्ड |
११:४८, ८ मार्च २०१६ ची आवृत्ती
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने 'ग्रंथाली' या प्रकाशनसंस्थेची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. शिवाय 'ग्रंथाली'ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. गांगल यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये 'एस.टी. समाचार' हे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन आहे.
गांगल हे 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्थापक सदस्य आहेत. साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधांत लेखन केले आहे.
दिनकर गांगल यांनी लिहिलेली पुस्तके
- कॅन्सर डायरी (लेखन-संपादन)
- भारतातील स्टेनलेस स्टील संस्कृतीचे जनक (सहलेखिका शरयू ठाकूर)
- माया माध्यमांची
- शोध मराठीपणाचा (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन)
- स्क्रीन इज द वर्ल्ड
दिनकर गांगल यांना मिळालेले पुरस्कार
- त्महाराष्ट्र सरकारचा 'सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्कार
- मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठा साहित्य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्कार
- वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्हाण' पुरस्कार