"गोवर्धन मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. गोवर्धन मेहता (जन्म : [[जोधपूर, २६ जून, इ.स. १९४३) हे एक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. राजस्थान विद्यापीठातून बी.एस्सी. व एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून |
|||
गोवर्धन मेहता |
|||
पीएच.डी. पदवी घेतली. नंतरच्या काळात त्यांनी बंगलोरची इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्सेस, हैदराबाद विद्यापीठ व इतरही अनेक संस्थांत संशोधनाचे पायाभूत काम केले. |
|||
{{विस्तार}} |
|||
कार्बनी रसायनशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय असून कार्बन व त्यांचे बंध तसेच मूलद्रव्यातील नावीन्यपूर्ण गुणधर्म यावर त्यांनी काम केले आहे. औषधे म्हणजे प्रत्यक्षात रेणू असतात, |
|||
रसायनशास्त्रात जे सौंदर्य आहे ते संयुगांच्या रचनेत आहे, असे त्यांना वाटते. त्यांनी एकूण ४०० शोधनिबंध लिहिले असून वेगवेगळ्या देशांत २५० व्याख्याने दिली आहेत. वार्धक्यात मेंदूचा ऱ्हास होत जातो व मेंदूच्या पेशी नवीन तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा ऱ्हास रोखणारी औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. काही नैसर्गिक पदार्थ हा ऱ्हास रोखू शकतात, असा दावा ते करतात. |
|||
संशोधन हाच त्यांचा छंद. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. हैदराबाद विद्यापीठात, बसायला खुच्र्या नव्हत्या तेव्हापासून त्यांचे काम सुरू आहे. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत. |
|||
डॉ. गोवर्धन मेहता यांना त्यांच्या कामाबद्दल ४०हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, त्यांपैकी काही हे :- |
|||
==पुरस्कार== |
|||
* जर्मनीत मिळालेला अलेक्झांडर हम्बोल्ट पुरस्कार (१९९५) |
|||
* जर्मनी सरकारचा ‘द क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्कार (२०१६) |
|||
* काउन्सिल ऑफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च--सीएसआयआरचा ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ (१९७८) |
|||
* भारत सरकारकडून पद्मश्री |
|||
[[Category:भारतीय शास्त्रज्ञ|मेहता, गोवर्धन]] |
[[Category:भारतीय शास्त्रज्ञ|मेहता, गोवर्धन]] |
||
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] |
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] |
||
[[वर्ग:संशोधक]] |
[[वर्ग:संशोधक]] |
||
[[वर्ग:रिकामी पाने]] |
१६:४०, २४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
डॉ. गोवर्धन मेहता (जन्म : [[जोधपूर, २६ जून, इ.स. १९४३) हे एक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. राजस्थान विद्यापीठातून बी.एस्सी. व एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेतली. नंतरच्या काळात त्यांनी बंगलोरची इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्सेस, हैदराबाद विद्यापीठ व इतरही अनेक संस्थांत संशोधनाचे पायाभूत काम केले.
कार्बनी रसायनशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय असून कार्बन व त्यांचे बंध तसेच मूलद्रव्यातील नावीन्यपूर्ण गुणधर्म यावर त्यांनी काम केले आहे. औषधे म्हणजे प्रत्यक्षात रेणू असतात, रसायनशास्त्रात जे सौंदर्य आहे ते संयुगांच्या रचनेत आहे, असे त्यांना वाटते. त्यांनी एकूण ४०० शोधनिबंध लिहिले असून वेगवेगळ्या देशांत २५० व्याख्याने दिली आहेत. वार्धक्यात मेंदूचा ऱ्हास होत जातो व मेंदूच्या पेशी नवीन तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा ऱ्हास रोखणारी औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. काही नैसर्गिक पदार्थ हा ऱ्हास रोखू शकतात, असा दावा ते करतात.
संशोधन हाच त्यांचा छंद. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. हैदराबाद विद्यापीठात, बसायला खुच्र्या नव्हत्या तेव्हापासून त्यांचे काम सुरू आहे. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत.
डॉ. गोवर्धन मेहता यांना त्यांच्या कामाबद्दल ४०हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, त्यांपैकी काही हे :-
पुरस्कार
- जर्मनीत मिळालेला अलेक्झांडर हम्बोल्ट पुरस्कार (१९९५)
- जर्मनी सरकारचा ‘द क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्कार (२०१६)
- काउन्सिल ऑफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च--सीएसआयआरचा ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ (१९७८)
- भारत सरकारकडून पद्मश्री