"पुरुषोत्तम जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पुण्यात राहणारे पुरुषोत्तम जोग यांना वाद्यांची दुरुस्ती करण्य... |
(काही फरक नाही)
|
०२:२४, १३ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
पुण्यात राहणारे पुरुषोत्तम जोग यांना वाद्यांची दुरुस्ती करण्याचा छंद आहे.
मूळचे कोकणातील चिपळूणचे असलेले जोग बी.कॉमची पदवी संपादन केल्यानंतर उपजीविकेसाठी पुण्यामध्ये आले व स्टेट बँकेमध्ये मोकरी करू लागले. वाद्य शिकण्याची सुप्त इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून त्यांनी फरासखान्यासमोर राहणाऱ्या बाबूराव क्षीरसागर यांच्याकडे तबलावादन शिकण्यास प्रारंभ केला. तबलावादनाचे दोन-चार महिने शिक्षण घेतल्यानंतर ते त्यांच्याचकडून तबला दुरुस्ती शिकले. तबला दुरुस्तीचे शिक्षण घेत असताना तपकीर गल्लीमध्ये राहणारे नानासाहेब घोटणकर यांच्याकडून त्यांना ऑर्गन दुरुस्तीचे प्रशिक्षण मिळाले आणि पुरुषोत्तम जोग यांचा बाद्यदुरुस्तीचा छंद वाढत गेला.
पुढे पुरुषोत्तम जोग ह्यांना अविनाश गोडबोले यांनी व्हायोलिन आणि हेमंत गोडबोले यांनी पियानो आणि अॅकॉर्डियन या वाद्यांच्या दुरुस्तीचे शिक्षण दिले. शेवटी २००० साली नोकरी सोडून देऊन जोगांनी पुण्यात माणिकबाग येथे मी वाद्यांच्या दुरुस्तीचे दुकान सुरू केले. त्यांच्या दुकानात संवादिनी, ऑर्गन, सतार, बासरी, दिलरुबा, पियानो, व्हायोलिन, संतूर, तबला, गिटार, अॅकॉर्डियन, तंबोरा अशा वेगवेगळ्या वाद्यांची दुरुस्ती होते.
पुरुषत्तम जोगांनी २००० ते २०१५ या पंधरा वर्षात दुरुस्त केलेली वाद्ये
- अॅकॉर्डियन – ३
- ऑर्गन – ५
- गिटार – २००
- तबला-ढोलक – १०००
- तंबोरे – १००
- दिलरुबे – १०
- पायपेट्या – ६
- संवादिनी – ९५०
- व्हायोलिन – ५०
पुरस्कार
निरपेक्षवृत्तीने करीत असलेल्या संगीत कार्याबद्दल पुण्यातील गानवर्धन संस्थेने पुरुषोत्तम जोग यांना २७ डिसेंबर २०१५ रोजी ‘वाद्य कारागीर पुरस्कार’ प्रदान केला.