"आशा पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आशा पाटील (जन्म : इ.स. १९३६; मृत्यू : कोल्हापूर, १८ जानेवारी, इ.स. २०१६)...
(काही फरक नाही)

१४:२४, १० फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

आशा पाटील (जन्म : इ.स. १९३६; मृत्यू : कोल्हापूर, १८ जानेवारी, इ.स. २०१६) या एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री होत्या. त्या मूळच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावच्या होत्या.

रत्‍नमालांनंतर आलेल्या आशा पाटील यांनी दादा कोंडकेंच्या व अनंत माने आणि यशवंत भालकर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या 'आई' आणि 'मावशी'च्या भूमिकांनी रसिकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली. त्यांनी १५०हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांत कामे केली. आशा पाटील यांनी आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकांना खळखळून हसवलेही आणि दुःखाशी संघर्ष करणारी 'माय' साकारून रडवले देखील. डॉ. काशीनाथ घाणेकर, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, विक्रम गोखले, अलका कुबल, प्रिया अरुण, वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते.

१९६० साली ‘अंतरीचा दिवा’ या माधव शिंदे दिग्दर्शित चित्रपटामधून आशापाटील यांनी साहाय्यक अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्या चित्रपटानंतर त्यांना एकापाठोपाठ एक चित्रपट मिळत गेले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातही काम केले. या नाटकातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली होती. ’एकच प्याला’च्या काही प्रयोगांतही त्या होत्या.

चित्रपटांतील भूमिकांबद्दल त्यांना उत्कृष्ट अभिनयाची अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

अवघ्या चित्रपटसृष्टीची 'आई'

चित्रपटांमधून आईची भूमिका साकारणार्‍या आशाताई पाटील अवघ्या मराठी चित्रपट सृष्टीत आई म्हणूनच ओळखल्या जात होत्या. उत्स्फूर्त अभिनय आणि लक्ष्यवेधी संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका सहजसुंदर वाटायच्या. ज्या पद्धतीने त्या चित्रपटातील सोज्वळ आणि प्रेमळ आईची भूमिका साकारत त्याच पद्धतीने त्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातही जगत होत्या. कौटुंबिकदृष्ट्या काहीसा खडतर प्रवास करावा लागलेल्या आशाताईंना अखेरची दीड वर्षे कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात राहावे लागले. मणका आणि किडनीचा त्रास असलेल्या आशा पाटील आयुष्याचे शेवटचे सहा महिने त्यांची कन्या तेजस्विनी भंडारी यांच्याकडे रहात होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होत आणि जेमतेम एका आठवड्याच्या उपचारांनतर त्यांची प्राणज्योत मावळली.

आशा पाटील याची भूमिका असलेले चित्रपट

  • अंतरीचा दिवा
  • आयत्या बिळावर
  • उतावळा नवरा
  • करावं तसं भरावं
  • कामापुरता मामा
  • गावरान गंगू
  • घे भरारी
  • चांडाळ चौकडी
  • तुमचं आमचं जमलं
  • निवृत्ती ज्ञानदेव
  • पदराच्या सावलीत
  • पळवा पळवी
  • पुत्य्रवती
  • प्रीतिविवाह
  • बन्याबापू
  • बोट लावीन तिथं गुदगुल्या
  • मंत्र्याची सून
  • माणसाला पंख असतात
  • माहेरची पाहुणी
  • माहेरची साडी
  • रंगल्या रात्री अशा
  • राम राम गंगाराम
  • वाजवू का
  • शाहीर परशुराम
  • शुभ बोल नार्‍या
  • साधी माणसं
  • सामना
  • सासरचं धोतर
  • सासुरवा्शीण
  • सुळावरची पोळी
  • सोयरीक
  • हृदयस्पर्शी

पुरस्कार

त्यांच्या अभिनयाची दखल घेत सरकारने विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.