"विलास राजे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: विलास राजे (जन्म : विसापूर-तालुका खटाव, १९५२; ) हे एक मराठी लेखक आहेत... |
(काही फरक नाही)
|
११:४०, ६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
विलास राजे (जन्म : विसापूर-तालुका खटाव, १९५२; ) हे एक मराठी लेखक आहेत.
विलास राजे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यतील करंजे. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. ते पुण्यातील विद्या महामंडळ प्रशालेतून (सध्याची आपटे प्रशाला) १९६९मध्ये मॅट्रिक झाले. राजे यांनी १९७२ साली आयटीआयचा ड्राफ््ट्समनचा अभ्यासक्रम पुरा केला व १९८० साली पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधून डी.एम्.ई ची पदविका घेतली. छोट्या-मोठ्या नोकर्या करत ते १९७५ साली वानसन इंडिया (सध्याची थर्मेक्स कंपनी) आलेआणि काही काळ प्रोजेक्ट इंजिनिअरची नोकरी करून यथावकाश निवृत्त झाले. १९०१ साली त्यांनी स्वतःची एजन्सी काढली.
निवृत्तीनंतर विलास राजे लिहू लागले. २०१६ सालपर्यंत त्यांचे दोन कथासंग्रह, आणितीन कवितासंग्रह प्रकाशित झाले. ’कुंभश्री’ नावाच्या मसिकाच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मराठी नियतकालिके आणि दिवाली अंकांतून त्यांचा साहित्य प्रवास चालू आहे.
विलास राजे यांची पुस्तके
- कथाकुंभ (कथासंग्रह)
- चैतन्याचा झरा (वैचारिक लेखसंग्रह)
- जीवनमुक्त : (गोरा कुंभार यांचे चरित्र)
- शब्दछंद (कवितासंग्रह)
- शब्दयात्री (कवितासंग्रह
- क्षणिका (चारोळीसंग्रह)