"कुद्रेमुख साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कुद्रेमणी किंवा कुद्रेमुख या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरच्... |
(काही फरक नाही)
|
१३:२२, ५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
कुद्रेमणी किंवा कुद्रेमुख या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरच्या गावात दर वर्षी एक मराठी साहित्य संमेलन भरते. या संमेलनाला कोणतेही अनुदान नसते. घरांघरांतून धान्य गोळा करून सर्वांना जेवळ दिले जाते. चौगलेसर, शिंदेबंधू, कवी चंद्रकांत पोतदार असे लोक गावकर्यांना सोबत घेऊन संमेलनाचे अप्रतिम आयोजन करतात. पंचक्रोशीतून लोक मिळेल त्या वाहनाने येऊन श्रवणभक्ती करतात. महाराष्ट्रातून निमंत्रित केलेल्या साहित्यिकांना ऐकताना भाषा-साहित्याचा उत्सव रंगून जातो. कन्नड भाषेच्या सक्तीमुळे मराठी भाषेची अस्मिता जागृत झालेली आहे. म्हणून इतर श्रीमंती झगमगाटापेक्षा भाषा-साहित्याचा शांत प्रकाश या संमेलनात पहायला मिळतो.
कर्नाटकी पोलिसांच्या पहार्यात हे संमेलन होते.