Jump to content

"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6360346
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:KanakRele.jpeg|thumb|300|डॉ. कनक रेळे]]
[[File:KanakRele.jpeg|thumb|300|डॉ. कनक रेळे]]

'''डॉ. कनक रेळे''' या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी कथकली आणि मोहिनी अट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. [[मोहिनीअट्ट्म]] नृत्यप्रराकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत ’नालंदा डान्स ॲन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या.
'''डॉ. कनक रेळे''' या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून कथकली आणि मोहिनी अट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. [[मोहिनीअट्ट्म]] नृत्यप्रराकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईतइ.स. १९६६ साली ’नालंदा डान्स अॅन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या.

गरीब घरातल्या नृत्य प्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्यासाठीचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘नालंदा केंद्रा’चे शुल्कदेखील कमी ठेवले आहे. त्यामुळे आजही या संस्थेत आदिवासी भागातील कित्येक मुली नृत्याच्या प्रेमाखातर शिकण्यासाठी येतात. शिक्षणाचा गंध नसलेल्या या मुली ‘नालंदा’ मधून नृत्य शिकून आपल्या गावामध्ये नृत्याची शाळा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतात. या केंद्रात प्रशस्त अभ्यासिका व ग्रंथालयदेखील आहे. याव्यतिरिक्त या केंद्रात योगा व संस्कृतचे शिक्षणही दिले जाते. ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’स थेट भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याकडून वैज्ञानिक व औद्यागिक संशोधन केंद्र म्हणून ओळख मिळाली आहे.

’नालंदा’ ही नृत्याला समर्पित संस्था उभी करण्यासाठी कनक रेळेंना खूप कष्ट करावे लागले. १९७२ साली मुंबई विद्यापीठात नृत्यावर स्वतंत्र पदवी सुरू करण्यासाठी सर्वाचा विरोध होता. वेश्यांसाठी पदवी सुरू करीत असल्याची वाईट प्रतिक्रियाही त्यांना ऐकावी लागली होती. मात्र नृत्यावरील प्रेमाखातर नृत्य हा अभ्यासाचा विषय म्हणून मुंबई विद्यापीठात रुजू करण्यासाठी रेळे यांनी पाठपुरावा केला.

कनक रेळे यांच्या कडे कायद्याची पदवी आहे. इंग्लंडमध्ये जाऊन ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयात त्यांनी शिक्षण घेतले. पण कायद्याच्या क्षेत्रात मन न रमल्याने त्यांनी नृत्य हेच ध्येय ठेवले.

भारतामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये ‘पीएचडी’ करणार्‍या कनक रेळे या पहिल्या आहेत.

पौराणिक कथेत नेहमीच दुय्यम महत्त्व दिल्या गेलेल्या व वेळप्रसंगी बंडखोरी करणार्‍या पात्रांना शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून बोलते करण्याचे श्रेय ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’च्या संस्थापिका व संचालिका डॉ. कनक रेळे यांच्याकडे जाते. महाभारतातील अंबा, द्रौपदी व गांधारी या व्यक्तिरेखांवर झालेला अन्याय त्यांनी देशविदेशांमध्ये आपल्या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. २०१६ साली या पात्रांमध्ये एकलव्य व नंदनार यांची भर पडली आहे.

==पुरस्कार==
==पुरस्कार==
* कालिदास सन्मान
* कालिदास सन्मान
* संगीत नाटक अकादमी ॲवॉर्ड
* संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड
* एम.एस. सुब्बलक्ष्मी ॲवॉर्ड
* एम.एस. सुब्बलक्ष्मी अॅवॉर्ड
* मुंबई विद्यापीठाची डी,लिट.
* मुंबई विद्यापीठाची डी,लिट.
* जीवनगौरव पुरस्कार
* जीवनगौरव पुरस्कार
* नाट्य विहार ॲवॉर्ड
* नाट्य विहार अॅवॉर्ड
* कुलपती ऑफ मोहिनी अट्टम ॲवॉर्ड
* कुलपती ऑफ मोहिनी अट्टम अॅवॉर्ड
* भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार
* भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार
* पुणे महापालिकेचा स्वरसागर संगीत पुरस्कार
* पुणे महापालिकेचा स्वरसागर संगीत पुरस्कार

०६:५९, २ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

डॉ. कनक रेळे

डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून कथकली आणि मोहिनी अट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनीअट्ट्म नृत्यप्रराकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईतइ.स. १९६६ साली ’नालंदा डान्स अॅन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या.

गरीब घरातल्या नृत्य प्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्यासाठीचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘नालंदा केंद्रा’चे शुल्कदेखील कमी ठेवले आहे. त्यामुळे आजही या संस्थेत आदिवासी भागातील कित्येक मुली नृत्याच्या प्रेमाखातर शिकण्यासाठी येतात. शिक्षणाचा गंध नसलेल्या या मुली ‘नालंदा’ मधून नृत्य शिकून आपल्या गावामध्ये नृत्याची शाळा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतात. या केंद्रात प्रशस्त अभ्यासिका व ग्रंथालयदेखील आहे. याव्यतिरिक्त या केंद्रात योगा व संस्कृतचे शिक्षणही दिले जाते. ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’स थेट भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याकडून वैज्ञानिक व औद्यागिक संशोधन केंद्र म्हणून ओळख मिळाली आहे.

’नालंदा’ ही नृत्याला समर्पित संस्था उभी करण्यासाठी कनक रेळेंना खूप कष्ट करावे लागले. १९७२ साली मुंबई विद्यापीठात नृत्यावर स्वतंत्र पदवी सुरू करण्यासाठी सर्वाचा विरोध होता. वेश्यांसाठी पदवी सुरू करीत असल्याची वाईट प्रतिक्रियाही त्यांना ऐकावी लागली होती. मात्र नृत्यावरील प्रेमाखातर नृत्य हा अभ्यासाचा विषय म्हणून मुंबई विद्यापीठात रुजू करण्यासाठी रेळे यांनी पाठपुरावा केला.

कनक रेळे यांच्या कडे कायद्याची पदवी आहे. इंग्लंडमध्ये जाऊन ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयात त्यांनी शिक्षण घेतले. पण कायद्याच्या क्षेत्रात मन न रमल्याने त्यांनी नृत्य हेच ध्येय ठेवले.

भारतामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये ‘पीएचडी’ करणार्‍या कनक रेळे या पहिल्या आहेत.

पौराणिक कथेत नेहमीच दुय्यम महत्त्व दिल्या गेलेल्या व वेळप्रसंगी बंडखोरी करणार्‍या पात्रांना शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून बोलते करण्याचे श्रेय ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’च्या संस्थापिका व संचालिका डॉ. कनक रेळे यांच्याकडे जाते. महाभारतातील अंबा, द्रौपदी व गांधारी या व्यक्तिरेखांवर झालेला अन्याय त्यांनी देशविदेशांमध्ये आपल्या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. २०१६ साली या पात्रांमध्ये एकलव्य व नंदनार यांची भर पडली आहे.

पुरस्कार

  • कालिदास सन्मान
  • संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड
  • एम.एस. सुब्बलक्ष्मी अॅवॉर्ड
  • मुंबई विद्यापीठाची डी,लिट.
  • जीवनगौरव पुरस्कार
  • नाट्य विहार अॅवॉर्ड
  • कुलपती ऑफ मोहिनी अट्टम अॅवॉर्ड
  • भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार
  • पुणे महापालिकेचा स्वरसागर संगीत पुरस्कार

.