"वि.सी. गुर्जर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: वि.सी. गुर्जर (१८८५-१९६२) हे मराठी लघुकथा लेखनात एक स्वतंत्र कालखं... |
(काही फरक नाही)
|
२१:०२, २४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
वि.सी. गुर्जर (१८८५-१९६२) हे मराठी लघुकथा लेखनात एक स्वतंत्र कालखंड सुरू कराणारे एक लेखक होते.
इ.स.१९१०पर्यंत नियतकालिकांमध्ये होणार्या कथांवरती बहुधा लेखकाचे नाव नसे, असलेच तर त्याचे टोपण नाव असे. १९१० च्या दिवाळी अंकापासून कथेचे वेगळे अस्तित्व जाणवू लागले व कथांवर लेखकाचे नावही मानाने झळकू लागले. या काळात कथेला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने वि.सी. गुर्जर यांच्याकडे जाते. गुर्जरांची कथा ही ‘संपूर्ण गोष्ट’ म्हणून ओळखली जाते. याचे कारण ह्या कथा मुख्यतः दीर्घकथाच होत्या. गुर्जरांनी कथालेखनाला १९१० च्या आसपास सुरुवात केली. १९६२ पर्यंत, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे कथालेखन अव्याहत चालू होते. त्यांनी सुमारे ७०० कथा लिहिल्या. त्यांच्या कथालेखनाचा काळ जरी १९६२ पर्यंत असला, तरी १९२० पर्यंतचे त्यांचे क्षेत्रातील कार्य महत्वाचे आहे. मनोरंजन मासिकातून प्रकाशित होणारी गुर्जरांची कथा हे त्या वेळी वाचकांचे प्रमुख आकर्षण होते.