"त्व आणि त्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: विशेषणापासून किंवा सामान्य नामापासून भाववाचक नाम करण्यासाठी व... |
(काही फरक नाही)
|
२३:३२, २१ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
विशेषणापासून किंवा सामान्य नामापासून भाववाचक नाम करण्यासाठी विशेषणाला अनेकदा ‘त्व’ हा प्रत्यय लागतो. विशेषण जर संस्कृत असेल तर ते विशेषण त्याच्या मूळ रूपात असायला हवे. उदा० महा हे विशेषण असेल तर त्याचे महत् हे मूळ रूप विचारात घावे लागते आणि मग आणि त्यालाच ‘त्व’ प्रत्यय लागू शकतो.
विषेषणाच्या मूळ रूपाच्या शेवटी ‘त्’ असेल तर भाववाचक नामात त्+त्व मिळून त्त्व येतो. मुळात ‘त्’ नसेल तर भाववाचक नामात त्व येतो.
त्त्व/त्ता असलेली भाववाचक नामे
- तत्+त्व=तत्त्व (म्हणून तत्त्वज्ञान, तत्त्ववेत्ता, तत्त्वहीन वगैरे)
- बुिद्धिमत्+त्व=बुद्धिमत्त्व (बुद्धिमत्+ता=बुद्धिमत्ता)
- महत्+त्व=महत्त्व
- विद्वत्=ता=विद्वत्ता
- व्यक्तिमत्+त्व=व्यक्त्मत्त्व
- सत्+त्व=सत्त्व (निःसत्+त्व=निःसत्त्व)
त्व असलेली भाववाचक नामे
- कर्ता+त्व=्कर्तृत्व
- जड+त्व=जडत्व (असेच गुरुत्व-गुत्वाकर्षण, वगैरे)
- दाता+त्व=दातृत्व (असेच मातृत्व, पितृत्व वगैरे)
- देव+त्व=देवत्व
- नेता+त्व=नेतृत्व
- मनुष्य+त्व=मनुष्यत्व
- ममता+त्व=ममत्व
- व्यक्ति+त्व=व्यक्तित्व
- स्त्री+त्व=स्त्रीत्व (असेच सतीत्व, नारीत्व, वगैरे.)
- वक्ता+त्व=वक्तृत्व
पहा :- मराठीतील सदोष अक्षरलेखन