Jump to content

"रॉयल ऑपेरा हाऊस (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुंबईत गिरगावाध्ये सँडहर्स्ट पुलाजवळ रॉयल ऑपेरा हाउस नावाची एक...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
मुंबईत गिरगावाध्ये सँडहर्स्ट पुलाजवळ रॉयल ऑपेरा हाउस नावाची एक देखणी इमारत आहे. जहांगीर फ्रामजी काकरा आणि मॉरिस बँडमन यांच्या प्रयत्‍नांतून हे ऑपेरा हाऊस उभारण्यात आले होते. या इमारतीसाठी तेव्हा साडे सात लाखांचा खर्च आला होता. १९१२मध्ये पाचव्या किंग जॉर्जने या वास्तूला 'रॉयल' अशी उपाधी वापरण्याची परवानगी दिली.
मुंबईत गिरगावाध्ये सँडहर्स्ट पुलाजवळ रॉयल ऑपेरा हाउस नावाची एक देखणी इमारत आहे. जहांगीर फ्रामजी काकरा आणि मॉरिस बँडमन यांच्या प्रयत्‍नांतून हे ऑपेरा हाऊस उभारण्यात आले होते. या इमारतीसाठी तेव्हा साडे सात लाख रुपयांचा खर्च आला होता. १९१२मध्ये पाचव्या किंग जॉर्जने या वास्तूला 'रॉयल' अशी उपाधी वापरण्याची परवानगी दिली.

ऑपेरा हाउसमध्ये बालगंधर्वांपासून ते राज कपूर, लता मंगेशकर अशा अनेक दिग्गजांनी आपली कला सादर केली. १६ ऑक्टोबर १९११ रोजी येथे पहिला कार्यक्रम झाला होता. पुढे चित्रपटांचे प्रस्थ वाढल्यानंतर नाटकांना आणि संगीत कार्यक्रमांना ओहोटी लागली आणि या वास्तूमध्ये चित्रपट दाखवण्याची सोय करण्यात आली. नावसुद्धा बदलून ‘न्यू ऑपेरा हाउस’ करण्यात आले. पुढे ऑपेरा हाऊसमध्ये चित्रपट पाहायला येणार्‍या रसिकांची संख्या कमी झाली त्यामुळे १९९१ मध्ये ऑपेरा हाऊसवर पडदा पडला. आणि या वास्तूची रयाच गेली. नंतरच्या काळात एकपडदा चित्रपटगृहांनाच वाईट दिवस आल्याने इमारतीत पुन्हा चित्रपटगृह होणे काठीण झाले. तेव्हा या इमारतीचा कायापालट करून परत तिला मूळचे भव्यदिव्य स्वरूप देण्याचे प्रयत्‍न नव्याने सुरू झाले.

१९५२ मध्ये गोडलच्या महाराजांनी ही वास्तू खरेदी केली. या वास्तूची मालकी त्यांचा मुलगा ज्योतेंद्रसिंह यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी २००९मध्ये या वास्तूला पुन्हा लोकांसाठी, कलाप्रेमींसाठी, कलाकारांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट आभा लांबा यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी असून सतीश धुपेलिया हे स्ट्रक्चरल इंजिनीअर आहेत.

रॉयल ऑपेरा हाऊसचे नूतनीकरण हे जबरदस्त आव्हान होते. या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी नेमणूक करण्यात आलेले कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट आभा लांबा सांगतात की, 'या वास्तूच्या बांधकामाला मोठा धोका निर्माण झाला होता. याच्या भिंतींमधून अनेक लहान-मोठी झाडे डोकवायला लागली होती. हा प्रकल्प हाती घेण्यासाठी कोणीही स्ट्रक्चरल इंजिनिअर तयार नव्हता. अखेर सतीश धुपेलिया यांनी हे आव्हान स्वीकारले. कमानींना आधार द्यावा लागला. स्टील गंजून गेले होते. छत दुरुस्त करण्यात आले. २०१२ साली ही वास्तू वर्ल्ड मॉन्युमेंट वॉचलिस्टच्या धोकादायक अवस्थेतील इमारतींच्या यादीत होती. मात्र आता ती सुरक्षित आहे.

१६ ऑक्टोबर २०१६ नंतर, म्हणजे पहिल्या कार्यक्रमानंतर बरोबर १०५ वर्षांनी, पुढच्या पिढ्यांसाठी रॉयल ऑपेरा हा‍उसचे हे व्यासपीठ जुन्या वैभवाने पुनरुज्जीवित होईल आणि त्याच श्रीमंती तोर्‍यात टिकून राहील अशी अपेक्षा आहे. गिरगावामध्ये आयुष्याचा दीर्घ काळ काढलेल्या जुन्या पिढीलाही ऑपेरा हाऊसच्या या वास्तूमध्ये बसून नवे सूर ऐकण्याची उत्सुकता आहे.

[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई मधील इमारती]]
[[वर्ग:मुंबईतील इमारती]]

१३:५७, ६ जानेवारी २०१६ ची आवृत्ती