Jump to content

"शशिकांत पुनर्वसू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शशिकांत पुनर्वसू या टोपणानावाने लिहिणारे मोरेश्वर शंकर भडभडे (ज...
(काही फरक नाही)

२३:५६, ४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

शशिकांत पुनर्वसू या टोपणानावाने लिहिणारे मोरेश्वर शंकर भडभडे (जन्म : पुणे, ३० सप्टेंबर, इ.स. १९१३; मृत्यू : ?) हे एक मराठी कथालेखक होते. त्यांनी काही प्रवासवर्णने लिहिली आहेत. ते स्वतः जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर होते व पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये अध्यापक होते. त्यांच्या पत्‍नी कमलाबाई भडभडे या पुण्यातील हुजूरपागा शाळेत शिक्षिका होत्या. शशिकांत पुनर्वसूंची बहीण लीला भडभडे या शांता शेळके यांच्या शाळामैत्रीण होत्या.

पुनर्वसूंच्या कथांमध्ये पुण्यातील पांढरपेशा ब्राह्मणी संस्कृतीचे चित्रण प्रामुख्याने होत असले, तरी त्यांच्या कथा तशाच संस्कृतीचेव चित्रण करणार्‍या य.गो. जोशी किंवा श्री.ज. जोशी यांच्या कथांपेक्षा वेगळ्या असत. त्या कथांमध्ये शालेय विश्वातल्या घडामोडी असत तर कधी साम्यवादी विचारसरणी डोकावे. शनिवार वाड्यानजीकच्या फुटक्या बुरुजापाशी ते रहात असले तरी पुण्यातील सदाशिव पेठेचा उल्लेख त्यांच्या कथांत वारंवार येई. त्यांचे लेखन अत्यंत गंभीरपणे, मनःपूर्वक केलेले असे, त्यात सूक्ष्मता, सूचकता आणि संयम होता. काव्यात्म आर्ततेचा एक सूर त्यांच्या कथांतून तरळत असे. अनुराधा विप्रदास, बाबा राजहंस अशी जरा वेगळी नावे त्यांच्या कथांत येत. त्याछ्या कथाटून त्यांची संगीताची जाणकारी, चित्रकलेची आवड, लहान मुलाबद्दल त्यांना वाटणारे वात्सल्य जाणवत असे.