"साधना (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नायर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. सन १९९५मध्ये दम्याच्या आजाराने नय्यर यांचे निधन झाले.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नायर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. सन १९९५मध्ये दम्याच्या आजाराने नय्यर यांचे निधन झाले.

त्यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे.

==स्टाईल आयकॉन==
साधना यांची हेअर स्टाइल हिंदी सिनेसृष्टीमध्ये खूपच फेमस झाली होती. साधना कट म्हणून ही हेअर स्टाइल इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे ती आजपर्यंत. हेअर स्टाइलप्रमाणेच त्यांच्या कपड्यांची स्टाइलदेखील बॉलीवूडमध्ये हिट ठरली होती. ७० च्या दशकात टाइट फिटिंगचा चुडीदार आणि कुर्ता ही स्टाइलदेखील त्यांनीच इंडस्ट्रीमध्ये आणली.

==साधनाचे सौंदर्य==

==चित्रपट==
साधना यांनी जवळपास ३५ हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांतले काही चित्रपट असे :-
साधना यांनी जवळपास ३५ हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांतले काही चित्रपट असे :-
* अनीता (१९६७)
* अनीता (१९६७)

१६:४९, ३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

साधना, पूर्ण नाव साधना शिवदासानी नायर (जन्म : २ सप्टेंबर, इ.स. १९४१; मृत्यू : २५ डिसेंबर, इ.स. २०१५)या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. साधना यांचा जन्म कराची, पाकिस्तान (त्याकाळी सिंध, ब्रिटिश इंडिया)मध्ये झाला होता. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले.

सर्वप्रथम १९५५ साली त्या राज कपूर यांच्या 'श्री ४२०' या चित्रपटातील 'मुड मुडके न देख मुड मुडके' या गाण्यावर केलेल्या नृत्याने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. सन १९५८मध्ये 'अबना' या सिंधी चित्रपटात त्यांनी काम केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता.

प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा 'स्क्रीन' मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना ' लव्ह इन सिमला' या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. त्या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे 'साधना कट' या नावाने खूप प्रसिद्ध झाली.

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नायर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. सन १९९५मध्ये दम्याच्या आजाराने नय्यर यांचे निधन झाले.

त्यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे.

स्टाईल आयकॉन

साधना यांची हेअर स्टाइल हिंदी सिनेसृष्टीमध्ये खूपच फेमस झाली होती. साधना कट म्हणून ही हेअर स्टाइल इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे ती आजपर्यंत. हेअर स्टाइलप्रमाणेच त्यांच्या कपड्यांची स्टाइलदेखील बॉलीवूडमध्ये हिट ठरली होती. ७० च्या दशकात टाइट फिटिंगचा चुडीदार आणि कुर्ता ही स्टाइलदेखील त्यांनीच इंडस्ट्रीमध्ये आणली.

साधनाचे सौंदर्य

चित्रपट

साधना यांनी जवळपास ३५ हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांतले काही चित्रपट असे :-

  • अनीता (१९६७)
  • अबना (भारतातला पहिला सिंधी चित्रपट, १९५८)
  • असली नकली (१९६२)
  • अमानत (१९७५)
  • आप आए बहार आई (१९७१)
  • आरजू ( १९६५)
  • इंतकाम (१९६९)
  • इश्क पर जोर नही (१९७०)
  • उल्फत की नई मंजिल (१९९५)
  • एक फूल दो माली (१९६९)
  • एक मुसाफिर एक हसीना (१९६२)
  • गबन (१९६६)
  • गीता मेरा नाम (१९७२)
  • छोटे सरकार (१९७४)
  • तुलसी (१९८५)
  • दिल दौलत दुनिया (१९७२)
  • दुल्हा-दुल्हन (१९६४)
  • परख (१९६०)
  • पिकनिक (१९६४)
  • प्रेमपत्र (१९६२)
  • बदतमीज (१९६६)
  • मनमौजी (१९६२)
  • महफिल (१९८१)
  • मेरा साया (१९६६)
  • मेरे मेहबूब (१९६३)
  • राजकुमार (१९६४)
  • लव्ह इन सिमला (नायिका म्हणून पहिला चित्रपट, १९६०)
  • वक्त (१९६५)
  • वो कौन थी (१९६४)
  • श्री ४२० (‘मुड़मुड़के ना देख’ या गाण्यात समूहनृत्यात, १९५५)
  • सच्चाई (१९६९)
  • स्त्री (उडीया चित्रपट, १९६७)
  • हम दोनों (१९६१)
  • हम सब चोर है (१९७३)