Jump to content

"बाळकृष्ण अनंत भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाळकृष्ण अनंत भिडे (जन्म : किडीम, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, इ.स. १...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ९: ओळ ९:


==बाळकृष्ण अनंत भिडे यांचे लेखन==
==बाळकृष्ण अनंत भिडे यांचे लेखन==
भिडे यांचे लेखन ‘श्री सरस्वतीमंदिर‘, ‘मासिक मनोरंजन‘, ‘विविधज्ञानविस्तार‘, ‘काव्यरत्‍नागिरी‘, रत्‍नाकर‘ यांसारख्या दर्जेदार नियतकालिकांतून प्रकाशित होत असे. त्यांच्या नावार एकूण १०८ कविता आहेत. त्यांच्या कवितांनी एकीकडे पंडिती वळण धारण केले आहे तर दुसरीकडे तत्कालीन आधुनिक इंग्रजी काव्याची छाप त्यांच्या कवितांवर दिसते. तुकाराम, मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन यांच्यावरील त्यांचे विस्तृत व विवेचक निबंध प्रसिद्ध आहेत.
भिडे यांचे लेखन ‘श्री सरस्वतीमंदिर‘, ‘मासिक मनोरंजन‘, ‘विविधज्ञानविस्तार‘, ‘काव्यरत्‍नागिरी‘, रत्‍नाकर‘ यांसारख्या दर्जेदार नियतकालिकांतून प्रकाशित होत असे. त्यांच्या नावावर एकूण १०८ कविता आहेत. त्यांच्या कवितांनी एकीकडे पंडिती वळण धारण केले आहे तर दुसरीकडे तत्कालीन आधुनिक इंग्रजी काव्याची छाप त्यांच्या कवितांवर दिसते. तुकाराम, मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन यांच्यावरील त्यांचे विस्तृत व विवेचक निबंध प्रसिद्ध आहेत. मोरोपंतांच्या केकावलीवर त्यांनी टीका-टिप्पणी केली आहे, साहित्य गुणांना प्राधान्य देऊन त्यांनी ज्ञानेश्वरीची सार्थ व सटीप आवृत्ती काढली..


भिड्यांच्या काव्यसंग्रह नावाच्या मासिकात जुन्या आणि नव्या साहित्य दृष्टीचा, संशोधन आणि समीक्षा यांचा संयोग आढळतो. प्राचीन आणि अर्वाचीन मराठी कवींची तुलनाही त्यांनी एका लेखात केली आहे.


===बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या ग्रंथरचना===

* अनेक प्राचीन काव्यांच्या संपादित आवृत्त्या

* ‘काव्य आणि काव्योदय‘, ‘श्री तुकाराम चरित्र‘,“किरण‘, ‘सुधारक‘, ‘आधुनिक कविपंचक‘,“विरहतरंग‘ आदी पुस्तकांवरील परीक्षणे

* चार वीर मुत्सद्दी (१९२८) - या पुस्तकात ऑलिव्हर क्रॉमवेल, जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन बोनापर्ट व शिवाजी यांची चरित्रे आहेत.

* प्रभुप्रसादन (काव्यसंग्रह, १९०७)
(अपूर्ण)
* फुलांचे झेले (काव्यसंग्रह, १९०८)
* मराठी कवींचे बोल (संपादित कवितासंग्रह, १९०७)
* मराठी भाषेचा आणि वाङ्मयाचा इतिहास (अपूर्ण ग्रंथ)
* मोरोपंतकृत महाभारताचे अनुशासन पर्व, अश्वमेध पर्व, आश्रमवासिक पर्व, महाप्रास्थानिक पर्व, मोसलपर्व, शांतिपर्व, स्वर्गारोहणपर्व (आदींची अर्थनिर्णायक विपुल टीपा, माहितीपूर्ण विवेचक प्रस्तावना, परिशिष्टे यांची भरपूर जोड देऊन काढलेल्या संपादित आवृत्त्या)
* ज्ञानेश्वरी (साहित्यगुणांना प्राधान्य देणारी आवृत्ती)


{{DEFAULTSORT:भिडे,बाळकृष्ण अनंत}}
{{DEFAULTSORT:भिडे,बाळकृष्ण अनंत}}

१८:४४, १३ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

बाळकृष्ण अनंत भिडे (जन्म : किडीम, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, इ.स. १८७४; मृत्यू : २ मे, इ.स. १९२९) हे एक मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक होते. त्यांचे बरेचसे गद्यलेखन ‘बी‘ या टोपणनावाने प्रसिद्ध झाले आहे. ‘बी‘ म्हणजे बाळकृष्ण, Bee नव्हे.

बाळकृष्ण अनंत भिडे यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे, तर माध्यमिक व उच्च शिक्षण मुंबईत झाले. १९१८ साली ते बी.ए. झाले. पण त्यापूर्वीच १८९४ ते १९८६ पर्यंत ते प्रभाकर नावाचे मासिक चालवीत. दापोली येथे ते शिक्षक म्हणून नोकरी करून पुढे ते मुरुड-जंजिरा येथे सर एस.ए. हायस्कूलचे (सर सिद्धी अहमदखान हायस्कूलचे) मुख्याध्यापक झाले.

बाळकृष्ण अनंत भिडे हे इ.स. १९०८ ते १९११ या काळात ‘काव्येतिहास‘ नावाच्या मासिकाचे आणि ‘खेळगडी‘ मासिकाचे संपादक होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे १९२४ साली मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वार्षिक उत्सव झाला. १९०४ ते १९०९ या काळात त्यांनी ‘काव्यसंग्रह‘ या मासिकाचे संपादन केले.

भिडे यांचे मराठी, इंग्रजी व संस्कृतवर सारखेच प्रभुत्व होते. ते एक परखड टीकाकार म्हणून प्रसिद्ध होते. माधव ज्युलियन यांना ते उपहासाने ‘प्रणयपंढरीचे वारकरी‘ म्हणत. रविकरण मंडळातील कवींच्या काव्यांतील भावनातरलत्व व प्रणय त्यांना सुरुवातीला आवडत नसे. मात्र पुढेपुढे त्यांनी या कवितांचे मोकळेपणाने कौतुक करू लागले. प्रतिपक्षाची भूमिका ते सनजावून घेत, पण स्वतःला पटलेल्या सत्याच्या समर्थनार्थ झुंजत असताना ते व्यक्तीची भीड, प्रतिष्ठा ठेवीत नसत. भिडे यांच्या चिकित्सक, मार्मिक व्यासंगपूर्ण टीकात्मक लेखांमुळे मराठी समीक्षा डौलदार, प्रौढ व प्रभावी बनण्यास साहाय्य झाले.

बाळकृष्ण अनंत भिडे यांचे लेखन

भिडे यांचे लेखन ‘श्री सरस्वतीमंदिर‘, ‘मासिक मनोरंजन‘, ‘विविधज्ञानविस्तार‘, ‘काव्यरत्‍नागिरी‘, रत्‍नाकर‘ यांसारख्या दर्जेदार नियतकालिकांतून प्रकाशित होत असे. त्यांच्या नावावर एकूण १०८ कविता आहेत. त्यांच्या कवितांनी एकीकडे पंडिती वळण धारण केले आहे तर दुसरीकडे तत्कालीन आधुनिक इंग्रजी काव्याची छाप त्यांच्या कवितांवर दिसते. तुकाराम, मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन यांच्यावरील त्यांचे विस्तृत व विवेचक निबंध प्रसिद्ध आहेत. मोरोपंतांच्या केकावलीवर त्यांनी टीका-टिप्पणी केली आहे, साहित्य गुणांना प्राधान्य देऊन त्यांनी ज्ञानेश्वरीची सार्थ व सटीप आवृत्ती काढली..

भिड्यांच्या काव्यसंग्रह नावाच्या मासिकात जुन्या आणि नव्या साहित्य दृष्टीचा, संशोधन आणि समीक्षा यांचा संयोग आढळतो. प्राचीन आणि अर्वाचीन मराठी कवींची तुलनाही त्यांनी एका लेखात केली आहे.

बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या ग्रंथरचना

  • अनेक प्राचीन काव्यांच्या संपादित आवृत्त्या
  • ‘काव्य आणि काव्योदय‘, ‘श्री तुकाराम चरित्र‘,“किरण‘, ‘सुधारक‘, ‘आधुनिक कविपंचक‘,“विरहतरंग‘ आदी पुस्तकांवरील परीक्षणे
  • चार वीर मुत्सद्दी (१९२८) - या पुस्तकात ऑलिव्हर क्रॉमवेल, जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन बोनापर्ट व शिवाजी यांची चरित्रे आहेत.
  • प्रभुप्रसादन (काव्यसंग्रह, १९०७)
  • फुलांचे झेले (काव्यसंग्रह, १९०८)
  • मराठी कवींचे बोल (संपादित कवितासंग्रह, १९०७)
  • मराठी भाषेचा आणि वाङ्मयाचा इतिहास (अपूर्ण ग्रंथ)
  • मोरोपंतकृत महाभारताचे अनुशासन पर्व, अश्वमेध पर्व, आश्रमवासिक पर्व, महाप्रास्थानिक पर्व, मोसलपर्व, शांतिपर्व, स्वर्गारोहणपर्व (आदींची अर्थनिर्णायक विपुल टीपा, माहितीपूर्ण विवेचक प्रस्तावना, परिशिष्टे यांची भरपूर जोड देऊन काढलेल्या संपादित आवृत्त्या)
  • ज्ञानेश्वरी (साहित्यगुणांना प्राधान्य देणारी आवृत्ती)