Jump to content

"बानी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बानी देशपांडे (जन्म : १९२७; मृत्यू : ४ डिसेंबर, २०१५) हे एक भारतीय कम...
(काही फरक नाही)

२२:१२, ७ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

बानी देशपांडे (जन्म : १९२७; मृत्यू : ४ डिसेंबर, २०१५) हे एक भारतीय कम्युनिस्ट पुढारी होते. ते कमुनिस्ट पक्षाचे टोलेजंग व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणार्‍या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे जावई, त्यांच्या रोझा नावाच्या मुलीचे पती होते.

कम्युनिस्ट असले तरी त्यांना इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे हिंदुस्थानी परंपरागत तत्त्वज्ञान, वेदवाङ्मय याविषयी इतर मार्क्सवाद्यांप्रमाणे घृणा नव्हती. त्यांचा संस्कृत आणि वेदान्ताचा गाढा अभ्यास होता. दोन वर्षांच्या अथक अभ्यासाअंती त्यांनी ‘युनिव्हर्स ऑफ वेदान्त’ हे पुस्तक लिहिले.

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी स्वतः या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. डायलेक्टिक्स वेदान्ताात आहे, असे बानींनी पुस्तकात म्हटले आहे. पाश्‍चात्त्य देशांकडे ओढा असलेल्या हिंदुस्थानींना आपल्या देशाबद्दल, भूतकाळाबद्दल आणि संस्कृतीबद्दल बोलायला कमीपणा वाटतो. विशेषतः हिरोडोरस, अ‍ॅरिस्टॉटल, एपिक्यूरस आणि हेगेल यांच्याविषयी बोलणे प्रतिष्ठेचे आणि आधुनिक वाटते तर बादरायण, व्यास, पतंजली किंवा शंकराचार्य यांच्याविषयी बोलणे केवळ मागासलेपणाचेच नव्हे तर राष्ट्रीय अभिनिवेशवादाचे प्रतीक आहे, असे बानींनी सांगितले आहे. या पुस्तकाला कॉ. डांगे यांनी प्रस्तावना दिल्यामुळे डांगे यांच्यावर कम्युनिस्टांनी त्यावेळी सडकून टीका केली होती. मात्र तरीही डांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले


(अपूर्ण).