"विष्णु गणेश पिंगळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १५: | ओळ १५: | ||
या सर्वांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आले. |
या सर्वांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आले. |
||
==पुस्तक== |
|||
[[विनायक दामोदर सावरकर]] यांनी लिहिलेल्या 'तेजस्वी तारे'या पुस्तकात दहा क्रांतिकारकांची ओळख करून दिली आहॆ, त्यांत विष्णु गणेश पिंगळे यांचा समावेश आहे. |
|||
११:०६, १० नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती
विष्णु गणेश पिंगळे (जन्म : २ जानेवारी, १८८९; मृत्यू : लाहोर, १६ नोव्हेंबर, १९१५) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांच्यासोबत ‘गदर पार्टी’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.
विष्णु गणेश पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे या गावचे राहाणारे असून १९११ साली अमेरिकेतून ईंजिनिअर झाले होते.. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करुन देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, पिंगळे, कर्तारसिंग सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ या दिवशी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. . फितुरीमुळे कट फसला आणि ८ क्रांतिकारक फासावर चढले.
दि.१६/११/१९१५ रोजी फासावर गेलेले ते ८ क्रांतिकारक
- विष्णु गणेश पिंगळे
- कर्तारसिंग सराबा
- सरदार बक्षीससिंग
- सरदार जगनसिंग
- सरदार सुरायणसिंग
- सरदार बुटासिंग
- सरदार ईश्वरसिंग
- सरदार हरनामसिंग
या सर्वांना लाहोरच्या कारागृहात फाशी देण्यात आले.
पुस्तक
विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या 'तेजस्वी तारे'या पुस्तकात दहा क्रांतिकारकांची ओळख करून दिली आहॆ, त्यांत विष्णु गणेश पिंगळे यांचा समावेश आहे.