"रजनी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: रजनी जोशी या मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या एक गायक-अभिनेत्री... |
(काही फरक नाही)
|
१३:३५, ८ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती
रजनी जोशी या मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या एक गायक-अभिनेत्री आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांच्याइतक्या वैविध्यपूर्ण भूमिका क्वचितच कुणी केल्या असतील. इ.स. १९६३ साली काम करायला सुरुवात केल्यापासून ५२ वर्षात त्यांनी कित्येक नाटकांचे हजारो प्रयोग केले आहेत. यांतल्या बहुतेक भूमिका त्यांना त्यांचा जोरकस आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व यामुळे मिळालेल्या आहेत.
मुंबई मराठी साहित्य संघाची नायिका, हीही त्यांची ओळख आहे. कारण साहित्य संघाने आणलेल्या बहुतांशी प्रत्येक संगीत नाटकात त्यांनी काम केले आहे. संगीत रंगभूमीवर त्यांची दाजी भाटवडेकर यांच्याशी विशेष जोडी जमली होती. संगीत रंगभूमीवर त्या केवळ गात बसल्या नाहीत, तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने संगीत रंगभूमीची सेवा केली आहे. सुहासिनी मुळगावकर यांनी केलेल्या शतरंगी संगीत किंवा गोविंदराव टेंबेंवरील कार्यक्रमात रजनीबाईंचा मुख्य पुढाकार होता. तसेच आज जशी 'सारेगमा' स्पर्धा आहे, तसा 'रत्नपारखी योजना' नावाचा उपक्रम सुहासिनी मुळगावकर तेव्हा चालवत. त्यातही रजनीताई स्पर्धकांना मार्गदर्शन करत.
रजनी जोशी यांचा अभिनय असलेली नाटके
- करीन ती पूर्र्व
- कोंडी
- खडाष्टक
- तुझे आहे तुजपाशी
- धाडिला राम तिने का वनी
- बेबंदशाही
- भाऊबंदकी
- मंदारमाला
- मानापमान
- मृच्छकटिक
- रमामाधव
- रेशीमधागे
- वाजे पाऊल आपुले
- सवाई माधवरावांचा मृत्यू
- सुंदर मी होणार
- सून माझी चांदणी
पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा नाट्याचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार (२०१५)
ऎक मराठी