"मीना वांगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मीना वांगीकर (जन्म : धारवाड, इ.स.१९५०; मृत्यू : पुणे, २८ ऑक्टोबर, इ.स.... |
(काही फरक नाही)
|
१४:४५, ३० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
मीना वांगीकर (जन्म : धारवाड, इ.स.१९५०; मृत्यू : पुणे, २८ ऑक्टोबर, इ.स. २०१५) या मराठी-कन्नड अनुवाद करणार्या एक लेखिका होत्या. मातृभाषा कन्नड असताना त्यांनी मराठीवर प्रभुत्व मिळवले होते.
त्या इंग्रजी व कन्नड भाषेत लिहिणारे लेखक व्ही.एम. इनामदार यांच्या कन्या होत्या.
मीना वांगीकर यांची कन्नड/मराठी पुस्तके
- रावबहादूर आर. जी. कुलकर्णी यांचेा ’धूमकेतू‘ (कन्नडमधून मराठीत)
- प्र-प्रवासाचा फ-फजितीचा (स्वतंत्र)
- व्यासराय बल्लाळ यांचे ’साहित्य अकादमी पुरस्कार‘प्राप्त ’बंड‘ (कानडीतून मराठीत)
- अनंतराव कुलकर्णीलिखित "मी जेनी‘ (मराठीतून कन्नड)
- मूकज्जी (कानडीतून मराठीत) : मूळ डॉ. शिवराम कारंथ याचेा ’ज्ञानपीठ पुरस्कार‘प्राप्त ’मूकज्जिय कनसुगळू’ ही कादंबरी
- मोह पश्चिमेचा (स्वतंत्र)
- ययाती वि.स. खांडेकर यांची ’ययाती’ (मराठीतून कानडीत)
- स्त्री माझे नाव असे (स्वतंत्र)
मीना वांगीकर यांना मिळालेलेपुरस्कार
- पुण्यातील मराठी-कन्नड स्नेहसंवर्ध्न केंद्राचा पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स. ह. मोडक पुरस्कार
- मुंबई कर्नाटक संघातर्फे वरदराज आचार्य पुरस्कार (१९९४)