"मस्तान तलाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|मस्तानी तलाव}} दक्षिण मुंबईतील नागपाडा विभागात असलेला मस...
(काही फरक नाही)

००:४५, २४ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

दक्षिण मुंबईतील नागपाडा विभागात असलेला मस्तान तलाव हा एकेकाळी खरोखरच तलाव होता. मस्तान नावाच्या एका परोपकारी माणसाने तो बांधला होता.

कावसजी पटेल टँक, नबाब टँक, सांकली टँक, दो टांकी आणि धोबी तलावांप्रमाणेच मस्तान तलाव हा आता मुंबईतील पाणी नसलेला, नुसत्याच नावाचा तलाव राहिला आहे.

मस्तान तलाव येथे एक मैदान आहे. या मैदानापासून निघणार्‍या मोर्चांपुढे बॅरिस्टर जिना भाषणे करीत असत. नागपाड्याचा मस्तान तलाव हा विभाग म्हणजे बास्केटबॉल खेळाचे माहेरघर समजला जातो. बहुसंख्य मुस्लिम वस्ती असणार्‍या या विभागात लहान-थोर सार्‍यांनाच बास्केटबॉल प्रिय असतो. आज या मैदानात वाय्‌एम्‌सीएचा बास्क्टबॉल संघ आहे. या मस्तान तलाव मैदानात खेळून मुंबईचे अनेक बास्केटबॉलपटू तयार झाले.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात मस्तान तलावाचा परिसर हा एक सक्रिय विभाग होता..

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात सेनेची आणि मुस्लिम लीगची युती होती. मस्तान तलाव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे नेते बनातवाला यांची सभा झाली होती.