"अष्टभुजा देवी (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एखाद्या देवीच्या मूर्तीला आठ हात असणे आणि तिला अष्टभुजादेवी म्ह...
(काही फरक नाही)

१४:१०, २३ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

एखाद्या देवीच्या मूर्तीला आठ हात असणे आणि तिला अष्टभुजादेवी म्हणून तिचे मंदिर बांधणे ही भारतात सर्वसाधारण गोष्ट आहे. पुणे शहरातही अष्टभुजा देवींची अशीच दोन मंदिरे आहेत. पहिले नारायण पेठ पोलीस चौकीच्या मागे नदीतीरावर असलेले मंदिर आणि दुसरे बुधवार पेठेतील मंदिर.

हे बुधवार पेठेतील मंदिर, फरासखान्याकडून पासोड्या विठोबाकडे जाणार्‍या रस्त्यावर, पासोड्या विठोबाच्या मंदिराच्या जरा अलीकडे उजव्या हाताला आहे. इथली अष्टभुजा देवीची मूर्ती दोन अडीच फूट उंच आहे. डोक्यावर मुकुट आहे, ढाल तलवार, त्रिशूळ, धनुष्य-बाण, कमळ, शंख अशी आयुधे तिच्या हातात आहेत.वरचे दोन हात उंचावलेले असून तर खालच्या डाव्या हाताने महिषासुराची शेंडी पकडली आहे. उजव्या हातात त्रिशूळ आहे, डावा पाय महिषासुरावर ठेवला आहे. मगे सिंह असून त्याने महिषासुराला पकडले आहे.. मूर्तीमागे एकप्रभावळ आहे. प्रभावळीत कुणाचा तरी एक झिजलेला चेहरा दिसतो. अष्टभुजा देवीची ही मूर्ती सुरेख आणि प्रमाणबद्ध आहे.

पुण्याच्या बुधवार पेठेतील हे अष्टभुजा देवीचे छोटेसे देऊळ १९ व्या शतकातले असावे. चापेकर नावाच्या महिलेने स्थापन केलेल्या या देवळाची व्यवस्था खोडके कुटुंबीय पाहतात.

भारतातली अष्टभुजा देवीची अन्य मंदिरे

  • विंध्य पर्वतावर एक अष्टभुजा देवीचे मंदिर आहे. या मंदिरातली देवी ही यशोदेची कन्या आहे. कंसाने दगडावर आपटून जिला मारायचा प्रयत्‍न केला आणि जी त्याच्या हातातून निसटून गेली, तीच ही यशोदा-कन्या, असे सांगितले जाते.
  • राजस्थानातील बालेर नावाच्या गावात अष्टभुजा देवीचे मंदिर आहे. तेथे दरवर्षी चैत्रात चार दिवसांचा मेळा भरतो.
  • उत्तर प्रदेशातील विंध्याचल गावाजवळ असेच एक अष्टभुजा देवीचे (दुर्गा देवीचे) मंदिर आहे. ह्याच गावात विंध्यवासिनीचेही देऊळ आहे.
  • नांदेड, भुसावळ, जालना येथील अष्टभुजा देवीची मंदिरे प्रसिद्ध आहेत.