"पुष्पलता रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: कीर्तन संजीवनी पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११ शप्टेंबर,... |
(काही फरक नाही)
|
२३:४९, २१ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
कीर्तन संजीवनी पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११ शप्टेंबर, इ.स. २०१०) या गायनाच्या अंगाने श्रवणीय कीर्तन करणार्या एक लोकप्रिय मराठी कीर्तनकार आणि लेखिका होत्या.
पुष्पलता रानडे यांचे आईवडील हैदराबादला असत. आई लक्ष्मीबाई लेले व मावशी कमलताई टिळक या दोघी लेखिका असून कीर्तने करीत. आईकडून व मावशीकडून पुष्पलताबाईंना लेखनाचा व कीर्तनाचा वारसा मिळाला. राजाभाऊ रानडे यांच्याशी लग्न करून त्या वयाच्या १५व्या वर्षी पुण्यात आल्या.
पुण्यात आल्यावर पुष्पलता रानडे यांनी शालेय शिक्षणाबरोबरच संगीताचे आणि नृत्याचे जे शिक्षण घेतले, त्याचा त्यांना कीर्तनकलेसाठी उपयोग झाला. त्याचबरोबर त्यांनी शिवणाचा, ग्रंथपालनाचा व माँटेसरी शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला; मराठी साहित्यविशारद, हिंदी कोविद आदी पदव्याही त्यांनी संपादन केल्या.
रंगभूमीवरील भूमिका आणि दिग्दर्शन
महाराष्ट्र कलोपासक संस्थेत पु.ल.देशपांडे, प्रभुदास भूपटकर, सेवा चौहान, भगवान पंडित, के.नारायण काळे, यांसारख्या मातब्बर नाट्य कलावंतांसोबत रंगमंचावरील भूमिका पुष्पलताबाईंनी गाजवल्या. पु.लं.च्या "वयम् मोठम् खोटम्" या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
आर्थिक संकट आणि कीर्तनांतून त्यावर मात
सारे व्यवस्थित चालले असताना ऐन उमेदीच्या काळात पुष्पलता रानडे व पती श्री.राजाभाऊ रानडे ह्याना फार मोठ्या आर्थिक व सामाजिक आघातांना सामोरे जावे लागले. पण कीर्तनानेच त्यांना संकटकाळी आणि आर्थिक ओढग्रस्त परिस्थितीत आधार दिला.
जगण्याची धडपड, हिंमत, वक्तृत्व, कर्तबगारी व विशेष गुणवत्ता ह्यांच्या जोरावर पुष्पलता रानडे यांच्या जीवनाची दिशाच बदलली. कीर्तनाद्वारे त्यांना भरपूर पैसा मिळू लागला. पण त्याही परिस्थितीत कीर्तनाच्या उत्पन्नातील मोठा वाटा त्यांनी फक्त सामाजिक कार्यावरच खर्च केला. प्रापंचिक खर्चासाठी पती राजाभाऊंच्या मदतीने स्वतःच्या घरात लक्ष्मीरोडवर त्यांनी 'संजीवन' नावाचा लॉज सुरू केला.
पुष्पलता रानडे यांनी लिहिलेली पुस्तके
पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे पुरस्कार
पुरस्कारांचे आजवरचे मानकरी
पुष्पलता रानडे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
(अपूर्ण)