"सुरेश चिखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: सुरेश चिखले (जन्म : इ.स. १९४९; मृत्यू : मुंबई, १२ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे... |
(काही फरक नाही)
|
००:२३, १४ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
सुरेश चिखले (जन्म : इ.स. १९४९; मृत्यू : मुंबई, १२ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक नामवंत मराठी अभिनेते व नाटककार होते.
चिखले हे ‘इंडियन नॅशनल थिएटर’ अर्थात ‘आयएनटी’च्या मुशीतून घडलेले लेखक होते. आंतरमहाविद्यालयीन विविध एकांकिका स्पर्धांमधून ते सहभागी झाले होते. त्यावेळी चिखले यांनी लेखनाबरोबरच अभिनयही केला होता. कॉ. कृष्णा देसाई खून खटल्यावर आधारित त्यांनी लिहिलेल्या एकांकिकेला ‘आयएनटी’च्या स्पर्धेत लेखन आणि दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले होते. तर ‘गुरू’ नावाच्या एकांकिकेसाठी त्यांना अभिनयाचेही पारितोषिक मिळाले होते. ‘आएनटी’च्या ‘ती फुलराणी’, ‘कोंडी’ या नाटकात चिखले यांनी अभिनय केला होता. ‘आयएनटी’च्या लोककला संशोधन केंद्रासाठीही त्यांनी काही काळ काम केले होते.
वेश्यांच्या जीवनावर चिखले यांनी लिहिलेल्या ‘गोलपिठा’नाटकाला मुंबईत काही नाटय़गृहात प्रयोग करण्यास बंदी होती. ही बंदी उठविली जावी, त्यासाठी काही ज्येष्ठ व मान्यवर साहित्यिकांसाठी या नाटकाचा खास प्रयोग त्यावेळी सादर करण्यात आला. त्यांनीही नाटकाला पसंतीची पावती दिली आणि त्यानंतर ‘गोलपिठा’साठी नाटय़गृहाचे दरवाजे उघडले गेले. पुढे राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेत या नाटकाला सवरेत्कृष्ट नाटकाचा पहिला पुरस्कारही मिळाला.
सुरेश चिखले यांची नाटके
- कोंडी (अभिनय)
- खंडोबाचं लगीन (लेखन)
- गुरू (अभिनय)
- गोलपिठा (लेखन)
- जांभूळ आख्यान (लेखन)
- ती फुलराणी (अभिनय)
- प्रपोजल (लेखन)
- शंभूराजे (लेखन). या नतकाचे साडेतीनशेच्या आसपास प्रयोग झाले.
(अपूर्ण)