"उद्धवबापू आपेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: उद्धवबापू आपेगावकर हे एक मराठी पखवाजवादक आहेत. पखवाज हे वाद्य ल...
(काही फरक नाही)

०६:५४, १३ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

उद्धवबापू आपेगावकर हे एक मराठी पखवाजवादक आहेत.

पखवाज हे वाद्य लोककला, भजन-कीर्तन एवढे सीमित न ठेवता त्याला सर्व संगीतप्रकारांमध्ये एवढेच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या फ्यूजनमध्येही स्थान मिळवून देण्याचे काम बीडच्या उद्धवबापू आपेगावकर यांनी केले आहे. उत्तम इंग्रजी बोलून यू-ट्यूब आदी माध्यमांशीही त्यांनी चांगली जवळीक साधली व आपेगावात राहूनच पखवाजवादनाला वैश्विक ख्याती मिळवून देण्याचे अखंड प्रयत्‍न केले.

बीड जिल्ह्यातील आपेगावच्या वारकरी संप्रदायातील शिंदे कुटुंबात पखवाजवादनाची परंपरा अव्याहत सुरू होती. मात्र ती वादनकला फक्त भजन-कीर्तनापुरती मर्यादित होती. शंकरबापू आपेगावकर यांनी शास्त्रशुद्ध पखवाजवादन शिकून या कलेला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला. हीच समृद्ध परंपरा त्यांचे पुत्र उद्धवबापू आपेगावकर सांभाळत आहेत. वडील शंकरबापू त्यांचे गुरू असले तरी कठोर परिश्रम करायला लावूनच त्यांनी हा शिष्योत्तम घडवला. घरची शेती सांभाळून उद्धवबापूंनी पखवाजवादनाला नवा आयाम दिला. तसेच धृपद गायकी, सूफी संगीत, शास्त्रीय संगीत, वारकरी संगीत अशा निरनिराळ्या प्रकारांत पखवाजवादनाला महत्त्व मिळवून दिले.

उद्धवबापूंची पहिली विदेशवारी २००१ मध्ये झाली . पण तेव्हापासूनच्या पुढील वर्षांत इंग्लंड, बेल्जियम, अमेरिका, नेदरलँड आदी देशात त्यांच्या सातत्याने मैफली झाल्या. लंडनच्या 'ऑपेरा हाऊस' मध्ये दर्जेदार कार्यक्रम सादर करून उद्धवबापूंनी परदेशातील रसिकांना पखवाजाची गोडी लावली. परदेशात कार्यशाळांच्या घेऊन त्यांनी अनेक कलाकार घडविले. परदेशी कलाकारांसोबत उद्धवबापूंनी सादर केलेल्या फ्यूजन कार्यक्रमाला रसिकांनी डोक्यावर घेतले. चार पखवाजवादकांसह त्यांनी 'पखवाज तालस्पर्श' नावाच्या कार्यक्रमातून रसिकांना नादमय विश्वाची सफर घडविली. आपेगावात रहात असलेल्या उद्धवबापू परदेशातील कलाकारांची नेहेमीच वर्दळ असते.