"चंद्रशेखर गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चंद्रशेखर गाडगीळ (जन्म: इ.स. १९४८; मृत्यू: २ ऑक्टोबर, २०१५) हे एक मरा...
(काही फरक नाही)

१७:५४, ३ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

चंद्रशेखर गाडगीळ (जन्म: इ.स. १९४८; मृत्यू: २ ऑक्टोबर, २०१५) हे एक मराठी गायक व पार्श्वगायक होते. त्यांनी पडित सदा​शिवबुवा जाधव यांच्याकडून किराणा घराण्याच्या गायकीची तालीम घेतली.

याशिवाय पं. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, यांसारख्या दिग्गजांकडेही त्यांनी गायनाचे शास्त्रशुद्ध धडे घेतले होते. चंद्रशेखर गाडगीळ यांनी मराठी संगीतामध्ये ५० वर्षे अविरत कार्य केले. ‘निसर्ग राजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’, ‘कानाने बहिरा मुका परी नाही’ ही त्यांची गाजलेली गाणी. त्यांनी अनेक भजनांनाही संगीत दिले.

गायिका रश्मी यांच्यासमवेत चंद्रशेखर गाडगीळ यांंनी ‘रश्मी ऑर्केस्ट्रा’ची स्थापना केली. ‘मेलडी मेकर्स’ या ऑर्केस्ट्राचे ते हुकमी गायक होते. एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले संगीतकार राम कदम यांनी ऑर्केस्ट्रांमध्ये लोकप्रिय असणार्‍या या गायकास, त्यांचा आवाज ऐकून व्ही. शांताराम निर्मित झुंज या चित्रपटात संधी दिली. या चित्रपटासाठी त्यांनी उषा मंगेशकर यांच्यासमवेत गायिलेली ‘निसर्गराजा ऐक सांगतो’ आणि ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही गीते लोकप्रिय झाली. ‘अरे कोंडला कोंडला देव’, ‘अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत’, ‘अजून आठवे ती रात्र पावसाळी’ ही गीते रसिकांच्या स्मरणात आहेत.